टीम मंगळवेढा टाईम्स।
राष्ट्रवादी काँगेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसेच लवकरच पवार हे भाजपसोबत जातील अशीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
याचवेळी राजकीय वर्तुळातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या प्रयत्नांना त्यांच्या पक्षातील आमदारांच्या संमती सह्या मिळाल्याने वेग आला आहे.
आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी संमतीच्या स्वाक्षऱ्या दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित आमदारांची यादी योग्यवेळी राज्यपालांकडे सादर करण्यात येणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. राष्ट्रवादीकडे सध्या स्थितीला 53 आमदार आहे. तर पक्षांतर बंदी कायद्याच्या नियमानुसार वेगळा गट स्थापन करण्यासाठी 36 आमदारांची गरज आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहे. राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्या असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह राज्याच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करणाऱ्या सेनेच्या खासदारांना सर्वोच्च न्यायालय अपात्र ठरवेल, असे गृहीत धरून अजित पवार यांच्याकडून ही खेळी खेळवली जात असल्याचे दिसते आहे. मात्र, या सर्वावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खडखडीत मौन आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांनी जाहीरपणे अजित पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. अजित पवार जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे. अजित पवार जिथे जातील तिथे आम्ही जाऊ. विधानसभेत अजित पवार यांच्या इतका ताकदवार नेता नाही.
तेच राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आहेत, अशी भूमिका पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, मावळचे आमदार सुनील शेळके व माणिकाराव कोकाटे यांनी घेतली आहे. त्यामुळे राजकारणातील घडामोडी आणखी कोणत्या दिशेला जाणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज