टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरू होत्या. भाजप सह शिवसेनेतील अनेक नेत्यांनी अजित पवार अस्वस्थ असल्याचं बोलून दाखवलं होतं.
त्यामुळे अजित पवार कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्राने अजित पवार हे 40 आमदारांसोबत भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन करतील अशी चर्चा सुरू आहे.
त्यामध्ये सुप्रीम कोर्टाकडून सत्तासंघर्षाचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भाजपकडून बी प्लॅन तयार केला जात असल्याचे बोलले जात आहे.
अजित पवार यांनी सोशल मिडियावरील पक्षाचे नाव, चिन्ह आणि स्वतःचा फोटो असलेला वॉलपेपर काढून टाकले आहे. #AjitPawar #NCP pic.twitter.com/h4osStG07u
— Kiran Balasaheb Tajne (@kirantajne) April 18, 2023
उद्धव ठाकरे यांच्यानंतर शरद पवार यांना भाजप धक्का देण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अजित पवार हे नाराज आहेत का? अजित पवार हे अस्वस्थ आहे का? असे विविध सवाल यानिमित्ताने उपस्थित केले जात आहे.
असे असतांना अजित पवार यांनी त्यांच्या सोशल मिडियावरील फेसबूक आणि ट्विटरवर वॉलपेपर काढून टाकला आहे.
अजित पवार यांनी यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाव आणि चिन्ह त्यासोबत शरद पवार यांच्यासोबतचा फोटो लावला होता. तो पोस्ट सहित डिलिट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जात आहे.
अजित पवार यांनी यापूर्वी भाजप सोबत काही तासांचे सरकार स्थापन केले होते. मात्र, शरद पवार यांनी त्यावेळी अजित पवार यांचे बंड क्षमवलं होतं.
त्यानंतर आता अजित पवार हे भाजप सोबत 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार अशी चर्चा सुरू असतांना अजित पवार यांच्या सोशल मिडियावरील वॉलपेपर हटविणे यावरून कुणाला इशारा आहे का? असेही बोलले जाऊ लागले आहे.
गेल्या दीड वर्षांपूर्वी लोगो काढला आहे असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.(स्रोत:TV9मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज