mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात राष्ट्रवादीतील मतभेद उघड! प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्र्याच्या आदेशाने नवीन व जुनी कार्यकारणी बरखास्त

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 10, 2021
in मंगळवेढा, राजकारण
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरातील व तालुक्यातील नवी व जुनी कार्यकारणी बरखास्त केले असल्याचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, मंगळवेढा तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संदर्भात, तालुक्यातील व शहरातील प्रमुख पदाधिकारी, नेते यांच्या लेखी निवेदन पत्रानुसार व येणाऱ्या जिल्हा परिषद / पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, संघटनात्मक फेरबदल करण्याचा निर्णय दि. १/१०/२०२१ रोजी घेण्यात आला होता.

त्यानंतर मंगळवेढा तालुक्यातील जुन्या कार्यकारिणीतील पदाधिकारी व नेते , राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांना वरील संदर्भाने भेटण्यासाठी गेले होते.

आदरणीय पवार साहेबांनी त्यांची बाजू ऐकून घेऊन सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना चौकशी केली होती . त्याच बरोबर नवनियुक्त पदाधिकारी व तालुका व शहरातील इतर पदाधिकारी देखील आदरणीय पवार साहेबांना भेटण्यासाठी गेले होते.

या पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी देखील पवार साहेबांच्या समोर आपली भूमिका वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये मांडली . जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांची व नेत्यांची बाजू ऐकून आदरणीय पवार साहेबांनी , मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी कार्यकारणी संदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील,

पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे, जिल्हाध्यक्ष , कार्यकारी जिल्हाध्यक्ष , तसेच जुन्या व नव्या कार्यकारिणीतील प्रमुख दोन ते तीन पदाधिकारी व दोन्ही बाजूचे एक दोन प्रमुख नेते यांची संयुक्त बैठक घेऊन मंगळवेढा तालुका कार्यकरीणी संदर्भात निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

त्याप्रमाणे प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री यांची वेळ घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे मी जिल्हाध्यक्ष या नात्याने, मंगळवेढा तालुका व शहरातील संघटनात्मक बदलासंदर्भात अंतिम निर्णय होईपर्यंत, मंगळवेढा तालुका व शहर राष्ट्रवादी कार्यकारणी ( जुनी व नवी ) बरखास्त करण्याचा निर्णय घेत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पक्ष संघटनेत बदल करताना जुन्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मंगळवेढा शहर व तालुका राष्ट्रवादी निवडी जाहीर केल्याने नाराज झालेल्या २० पदाधिकारी यांनी पक्षनेते अजित जगताप व तालुकाध्यक्ष भारत बेदरे यांच्या नेतृत्वाखाली गोविंदबाग गाठत हायकमांड शरद पवार यांच्याकडे जिल्हा नेतृत्वाबद्दल तक्रारीचा पाढा वाचला होता.

तसेच नव्या निवडीला आव्हान दिले होते. दुसऱ्याच दिवशी खा. शरद पवार यांचा सोलापूर दौरा झाला त्यादरम्यान याबाबत गुप्त चर्चा झाली, अखेरीस जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी या नव्या निवडीला स्थगिती दिल्याचे पत्रच दिले.

पुढील दोन तीन महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत गटबाजी समोर आली असल्याने पक्षाला याचा किती फटका बसतोय हे येणाऱ्या काळात समजणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढाराष्ट्रवादी

संबंधित बातम्या

Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मंगळवेढेकर सावधान! घरगुती गॅस सिलेंडर वापरताना ‘ही’ चूक पडेल महागात; व्यावसायिक वापर आढळल्यास थेट गुन्हे दाखल होणार

March 14, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळजनक! मंगळवेढ्यात माजी उपसरपंचावर जीवघेणा हल्ला; लोखंडी साखळी अन् केबलने बेदम मारहाण, मोबाईलही लुटला

March 14, 2026
मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

March 13, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

मंगळवेढा तालुका सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी औदुंबर देवकते, तर कार्याध्यक्षपदी पांडुरंग चौधरी यांची निवड

March 10, 2026
Next Post
नागरिकांनो! वस्तू 3 आणि हफ्ता फक्त 1 आणि तेही फक्त 1990 रुपयांत; टीव्ही,फ्रीज,वॉशिंग मशिन, खरेदी करा महिना भरा फक्त 1990 हफ्ता

नागरिकांनो! वस्तू 3 आणि हफ्ता फक्त 1 आणि तेही फक्त 1990 रुपयांत; टीव्ही,फ्रीज,वॉशिंग मशिन, खरेदी करा महिना भरा फक्त 1990 हफ्ता

ताज्या बातम्या

चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

कामाची बातमी! अ‍ॅट्रोसिटी कायद्यात महत्त्वाचा बदल; आता एफआयआर दाखल होताच अटक नाही, ‘या’ नंतरच कारवाई

March 14, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मंगळवेढेकर सावधान! घरगुती गॅस सिलेंडर वापरताना ‘ही’ चूक पडेल महागात; व्यावसायिक वापर आढळल्यास थेट गुन्हे दाखल होणार

March 14, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळजनक! मंगळवेढ्यात माजी उपसरपंचावर जीवघेणा हल्ला; लोखंडी साखळी अन् केबलने बेदम मारहाण, मोबाईलही लुटला

March 14, 2026
मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

मंगळवेढ्यात सभापतींचा ‘सपाटा’! पहिल्याच दिवशी शाळा अन् पोषण आहाराची झाडाझडती; हार-तुरे बाजूला सारून सभापती दिपाली ताड यांनी जाणून घेतल्या मुलांच्या अडचणी

March 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा खाणीत बुडून मृत्यू; वर्गातील सवंगड्यांसोबत गेला असताना घडली घटना

March 13, 2026
शेतकऱ्यांनो! राज्यात तीन दिवस यलो अलर्ट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस अन् गारपिटीचीही शक्यता; नागरिकांना सतर्केतेच्या सुचना

शेतकऱ्यांना चिंता! ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्वाचे

March 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..