mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शरद पवारांचे ‘ते’ व्यक्तव्य म्हणजे दुर्दैवी; 23 कारखाने कोणी घशात घातले? शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राजू शेट्टी यांचा पवारांवर हल्लाबोल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 18, 2022
in मंगळवेढा, राजकारण, राज्य

टीम मंगळवेढा टाईम्स। 

साखर संघाचे अध्यक्ष शरद पवार आणि उसाचे दर हेच ठरवणार. सगळ्यात जास्त कारखाने यांच्या ताब्यात. शेतकरी आळशी आहे, तुम्ही शहाणी माणसे आहात.

त्यामुळे तुम्ही आमच्यावर सत्ता गाजवत आहात. तुमचा रोहित लई शहाणा निघाला. तो मताची शेती करतो. कन्‍नड साखर कारखाना घशात घालून तो अती कष्टाळू झाला आहे. शरद पवार कुटुंबीयांनी 23 कारखाने घशात घातले आहेत, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाच उत्पादन घेण्यासाठी काय काय करावं लागत हे शरद पवार साहेबांना अजून माहिती नाही, 18 महिने ऊसाची जोपासना तळ हातांच्या फोडाप्रमाणे करावी लागते.

राष्ट्रीवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्याला आळशी पीक म्हटलंय, त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मंगळवेढ्यातील संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

उसाच्या लागणी पूर्वी तीन महिने मशागत, पूर्वमशागत, हिरवळीच्या खताच नियोजन, रात्री- अपरात्री पाण्यासाठी शेतात  जाण, रासायनिक खत फवारण, बांगलनी करण, बरणी, साऱ्या सोडण,

वाकूडी मारण, कारखान्यात नोंदीसाठी चिटबॉय संचालक मंडळाच्या माग हिंडण, उसाच्या तोडीसाठी हातापाया पडणं, त्यांना ढाब्यावर नेऊन पार्ट्या देण, ऊस कारखान्याला गेल्यानंतर त्याची एफआरपी मिळवण्यासाठी आंदोलन करण,

मोर्चे काढणं, पोलिसांच्या लाट्याकाट्या खाण, केसेस अंगावर घेणं, कोर्टाचे हेलपाटे करण हे सगळं ऊस उत्पादक शेतकऱ्याला करावे लागत आहे.

यामुळे उसाला आळशी शेतकऱ्याच पीक म्हणणं चुकीचंय.. या उलट याचं आळशी लोकांच्या जीवावर आज महाराष्ट्रातली कारखानदारी उभी राहिलेली आहे.

या महाराष्ट्रातल्या कारखानदारीमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर राजकारणासाठी पैसा उपलब्ध होतोय, तर जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी साखर कारखाने हे राजकारणाचे अड्डे करून जे लोक बांडगुळासारखं वाढतायत त्यांचा मूळ पोशिंदा हा ऊस उत्पादक शेतकरीच आहे. त्याला आळशी म्हणणं ही अतिशय दुर्दैवाची आहे.

आणि शेतकऱ्याला हे पसंत पडलेल नाहीये. पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, “शरद पवार साहेब हे 10 वर्ष कृषी मंत्री होते आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना सर्वात जास्त शेतीमधलं कळत, पण त्यांच्या एक गोष्ट ध्यानात यायला पाहीजे की, ऊस हे असं एकमेव पीक आहे.

ज्याला हमीभावाचं कायदेशीररीत्या संरक्षण आहे. बाकीच्या पिकांचा हमीभाव हा कागदावर राहतो. प्रत्यक्षात बाजारामध्ये हमी भावपेक्षा कमी किंमतीने शेती माल विकावा लागतो. इतर पिकांच्या तुलनेमध्ये उसला कमी फायदा होतो.

पण तो शाश्वत फायदा होतो. मात्र, आर्थिक सुरक्षितातेमूळ, दराच्या निश्चिततेमुळे शेतकरी उसाकडे वळतो. राजू शेट्टी हे आजपासून पुढील तीन दिवस सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. राज्यभर त्यांनी बळीराजा हुंकार यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.(स्रोत:साम TV )

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: राजू शेट्टी

संबंधित बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
Next Post
मंगळवेढ्याच्या वैभवात भर! आंबट गोड कॅफे & नट्स या तिसाव्या शाखेचा आज उद्घाटन सोहळा; भेळ, चाट आणि बरंच काही एकाच छताखाली

मंगळवेढ्याच्या वैभवात भर! आंबट गोड कॅफे & नट्स या तिसाव्या शाखेचा आज उद्घाटन सोहळा; भेळ, चाट आणि बरंच काही एकाच छताखाली

ताज्या बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..