टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत दाखल झालेल्या दोन दरोड्यांतील आरोपी नारायण शितोळ्या भोसले यास अटक करून त्याच्याकडून १ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने,
एक मोबाईल असा मुद्देमाल जप्त केले त्याच्याकडून २ गुन्हे उघड करण्याची विशेष कामगिरी पोलीस निरीक्षक रणजितसिंह माने यांच्या पथकाने केली आहे.
दि.७ ऑगस्ट २०२१ रोजी पहाटे मंगळवेढा शहरातील दामाजीनगर येथे दरोडा टाकून फिर्यादीच्या पतीस सळई व काठ्याने मारहाण करून गंभीर जखमी केले.
फिर्यादीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा ५८,४०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन गेले होते. २४ डिसेंबर २०२१ रोजी नागणेवाडी येथे दुसरा दरोडा टाकून फिर्यादी व त्याच्या मुलास,
सुनेस चाकूने जिवे मारण्याची धमकी देऊन दमदाटी करत सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा मुद्देमाल घेऊन गेले होते.
या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपी रवि ऊर्फ विकी बाळुराव भोसले (वय ३०), नजिर झुंबर पवार ऊर्फ पारधी (वय ४०, कर्नाटक ), दिनकर नारायण भोसले ( वय १९, रा.धर्मगाव,ता.मंगळवेढा),
दीपक ऊर्फ बायबुल ऊर्फ बबलु सावंत ऊर्फ झुंबर पवार (वय ४५, रा.हनुमान टेकडी, क्रांती नगर लोणावळा, जि.पुणे ) यांना १५ फेब्रुवारी रोजी वेगवेगळ्या जिल्ह्यातून व कर्नाटक राज्यातून ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून नमूद गुन्ह्यातील सोन्याचे दागिने व मुद्देमाल हस्तगत केला होता.
कुख्यात दरोडेखोर नारायण शितोळ्या भोसले हा पंढरपूर तालुक्यातील नेपतगाव या ठिकाणी आल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने मंगळवेढा पोलिसांनी त्यास शिताफीने नेपतगाव शिवारात पकडले.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीतसिंह माने, दयानंद हेंबाडे, चंदनशिवे, अजित मिसाळ, सोमनाथ माने, मलसिद्ध कोळी, राजू आवटे, चालक विक्रम वाघमारे यांनी केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज