mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तरूण व बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठीच माझी उमेदवारी : सिध्देश्वर आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 6, 2021
in मंगळवेढा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील गेल्या तीस वर्षात कोणतीही महत्त्वाचा प्रश्न सुटला नसून मतदार संघातील तरूण व बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी माझी उमेदवारी असल्याचे प्रतिपादन अपक्ष उमेदवार सिध्देश्वर आवताडे यांनी केले आहे.

शेतकरी, कामगारांना न्याय देण्यासाठीच आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांनी माचनूर (ता. मंगळवेढा) येथील सिध्देश्वर मंदिरापासून मंगळवारी शेतकरी, कार्यकर्ते रॅली काढत आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे.

व्यासपीठावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे,दामाजी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विठ्ठल घुले,नंदकुमार पडवळे,दामाजी कारखान्याचे संचालक लक्ष्मण नरुटे, पंचायत समितीचे सदस्य सूर्यकांत ढोणे, पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब शिंदे, अँड.दत्तात्रय तोडकरी, महाराष्ट्र केसरी समाधान घोडके,सार्वजनिक शिवजयंतीचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड,उद्योजक विजय भोसले,युवराज घुले,संभाजी ब्रिगेडचे समाधान क्षीरसागर,माजी सदस्य संजय पवार जनार्धन डोरले, चोखामेळानगरचे उपसरपंच सुहास पवार,आनंदा पाटील, चनबसू येणपे,अँड.इरफान सय्यद, अँड.गुरुराज बुरुकुल आदीजन उपस्थित होते.

सिध्देश्वर आवताडे पुढे बोलताना म्हणाले की,पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची निवडणूक गेली १२ वर्ष मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावच्या उपसा सिंचन योजनेच्या प्रश्नावर लढविली जात आहे. हा प्रश्न व्यवस्थित शासन दरबारी मांडून सोडविणे शक्य असले तरी विद्यमान लोकप्रतिनिधींनी ते चुकीच्या पद्धतीने मांडून लाभार्थी गावातील शेतकरी, नागरिकांची दिशाभूल केली आहे.

त्यामुळेच हक्काच्या पाण्यापासून नागरिक वंचित आहेत. इतर प्रश्न न सोडविता त्याचे फक्त भांडवल केल्यामुळे लोक हक्काच्या योजनांपासून वंचित असून या योजनांना आपले प्रथम प्राधान्य असल्याचे सिध्देश्वर आवताडे यांनी सांगितले.

तसेच आपली उमेदवारी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगारांच्या न्याय हक्कासाठी आहे. मागील काळामध्ये सहकारी साखर कारखानदारी स्वत:ची खाजगी मालमत्ता समजून शेतकरी, कामगारांची देणी न देता त्याच पैशांवर निवडणुका जिंकायच्या व शेतकरी, कामगारांची पिळवणूक करायची, ही प्रथा रूढ झाली आहे.

बाळासाहेब शिंदे बोलताना म्हणाले की, सिध्देश्वर आवताडे यांच्यावर असलेल्या विश्वासावर मी त्यांच्या सोबत गेलो आहे. ग्रामीण भागातील येणाऱ्या नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सिध्देश्वर आवताडे हे चोवीस तास उपलब्ध असतात.

गेल्या अनेक वर्षांपासून एक लोकप्रतिनिधी पाणी देतो म्हणतोय एक प्रतिनिधी पाणी आणतो म्हणतोय पण आजपर्यंत येथील शेतकऱ्यांना पाणी काय मिळाले नाही.शेती संदर्भात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सिद्धेश्वर आवताडे यांना विजयी केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

समाधान क्षिरसागर बोलताना म्हणाले की, सर्वानी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.पण सिद्धेश्वर आवताडे यांनी मोठ्या ताकतीने प्रचाराची सुरुवात केली आहे. एका बाजूला पैशावर तोलणारी माणसे आहेत.तर दुसऱ्या बाजूला सर्व जनता व कार्यकर्ते सोबत असलेली माणसे आहेत

सिद्धेश्वर आवताडे व बबनराव आवताडे यांनी आजपर्यंत अनेक जणांना आधार दिला आहे. गेल्या अनेक वर्षापासून फक्त विकासाचे राजकारण केले आहे.येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सिध्देश्वर आवताडे यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

युवराज घुले बोलताना म्हणाले की,  या निवडणुकीत आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सिद्धेश्वर आवताडे यांना आपण विजय केले पाहिजे.इतर पक्षांनी ही निवडणूक प्रतेष्ठेची केली आहे. आपण त्यांना त्यांची जागा दाखवून नवीन तरुण उमेदवार निवडून दिला पाहिजे. सर्वांसाठी वेळ देणारा व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रथम प्रधान्ये देणारा तरुण आपण विधानसभेत पाठवा असे आवाहन घुले यांनी केले.

दरम्यान याप्रसंगी अपक्ष उमेदवार किशोर सीताराम जाधव यांनी आपला पाठिंबा सिद्धेश्वर आवताडे यांना दिला आहे. याप्रसंगी जमीर इनामदार, संग्राम माने सरकार,दिलीप खांडेकर, रणजित जगताप,गणेश जोरवर,ज्ञानेश्वर बाबर, यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.

कार्यक्रमाचे प्रस्तावित अँड.दत्तात्रय तोडकरी यांनी केले सूत्रसंचालन भारत मुढे तर आभार सागर आवताडे यांनी मानले.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सिध्देश्वर आवताडे
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

पुण्यात 2018 पासून 2023 पर्यंत वेळोवेळी, तरुणी म्हणतेय की? मंगळवेढ्यातील त्या तरुणाने…

February 3, 2023
मनसेचे अमित ठाकरे आज मंगळवेढ्यात; प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

मनसेचे अमित ठाकरे आज मंगळवेढ्यात; प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

February 3, 2023
धाडसी कारवाई! मंगळवेढ्यात पिकअपभरून 23 लाखांचा गुटखा आणला खरा; मात्र पोलिसांनी पकडला

धाडसी कारवाई! मंगळवेढ्यात पिकअपभरून 23 लाखांचा गुटखा आणला खरा; मात्र पोलिसांनी पकडला

February 2, 2023
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

मंगळवेढ्यात ‘या’ मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये नोकरीची संधी, घडवा एक लखलखते करियर; आजच करा अर्ज

February 2, 2023
दामाजी कारखान्याकडून अँडव्हान्स ऊसबिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; ‘हा’ प्रकल्प उभारण्यात येणार

आला उन्हाळा! अमर इलेक्ट्रॉनिक्स आयोजित AC सर्विस कैम्प, A.C. कोणताही असो, कोठूनही घेतला असो सर्विस आम्ही देणार; तेही 50% डिस्काउंट सहित; संपर्क:-9975786514

February 2, 2023
शिवशंभो कलेक्शन आता नवीन जागेत; दिवाळी निमित्त खरेदीवर 10 टक्के डिस्काउंट

मंगळवेढ्यात कपड्यांचा अनोखा मॉल; 10 हजारांच्या खरेदीवर अनामिका क्लॉथ सेंटरकडून पाच हजारांची खरेदी मोफत

February 2, 2023
उत्सुकता संपली! दामाजी कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवानंद पाटील तर उपाध्यक्षपदी ‘हे’ नाव निश्चित; आज होणार शिक्कामोर्तब

दामाजी कारखान्याकडून अँडव्हान्स ऊसबिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; ‘हा’ प्रकल्प उभारण्यात येणार

February 2, 2023
मंगळवेढ्यातून भरदिवसा मोटारसायकलची चोरी; घरफोडी, मोटारसायकल चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ; ‘या’ ठिकाणी झाल्या चोऱ्या

पोलिसांना चॅलेंज! हळदीच्या कार्यक्रमाला कुटूंब गेल्याने मंगळवेढ्यात चोरट्याने मारला तिजोरीवर दिवसाढवळ्या डल्ला

February 1, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात झाडे तोडण्याच्या कारणावरुन एका महिलेस चावा घेवून कोयत्याने केला हल्ला

February 1, 2023
Next Post
आवताडे-परीचारकांचे मनोमिलन झाल्यास राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव अटळ?

पंढरपूरमध्ये लॉकडाऊनला मोठा विरोध, गुन्हे दाखल झाले तरी उद्यापासून दुकाने उघडणार; व्यापाऱ्यांनी घेतला निर्णय

ताज्या बातम्या

धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

पुण्यात 2018 पासून 2023 पर्यंत वेळोवेळी, तरुणी म्हणतेय की? मंगळवेढ्यातील त्या तरुणाने…

February 3, 2023
मनसेचे अमित ठाकरे आज मंगळवेढ्यात; प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

मनसेचे अमित ठाकरे आज मंगळवेढ्यात; प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

February 3, 2023
धाडसी कारवाई! मंगळवेढ्यात पिकअपभरून 23 लाखांचा गुटखा आणला खरा; मात्र पोलिसांनी पकडला

धाडसी कारवाई! मंगळवेढ्यात पिकअपभरून 23 लाखांचा गुटखा आणला खरा; मात्र पोलिसांनी पकडला

February 2, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

दहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना, परीक्षेला उशीरा याल तर परीक्षेला मुकाल; यावर्षी असणार असे बदल

February 2, 2023
धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

धक्कादायक! पंढरपुरात तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा; होऊ लागला मळमळ-उलटीचा त्रास

February 2, 2023
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

मंगळवेढ्यात ‘या’ मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये नोकरीची संधी, घडवा एक लखलखते करियर; आजच करा अर्ज

February 2, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा