टीम मंगळवेढा टाईम्स।
मयताची पोलिसात खबर न देता परस्पर अंत्यविधी केल्याप्रकरणी सचिन श्रीरंग माळी, केशर नागनाथ जावळे, बंडू बालम शिंदे, देवीदास मोहन शिंदे सर्व रा.आंधळगांव या चौघाविरूध्द मंगळवेढा पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, दि.१३ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वा. आंधळगांव येथील मयत नामे नागनाथ लक्ष्मण जावळे याचा
गेल्या सात महिन्यापुर्वी गाडीवरून जात असताना चक्कर येवून पडून गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचाराकरीता महिला हॉस्पीटल, मंगळवेढा येथे दाखल केले होते. तेथून पुढे सोलापूर येथील हॉस्पीटलमध्ये रेफर करण्यात आले. मात्र
तो उपचारास प्रतिसाद देत नसल्यामुळे डिस्चार्ज देवून घरी आणले होते. दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वा. नागनाथ जावळे मयत झाल्याने यातील वरील आरोपीनी मयताची पोलिसात खबर न देता परस्पर
अंत्यविधी केला व असल्याची पोलिस पाटील राणी निवास माळी यांनी पोलिसात दिल्यावर वरील चौघाआरोपीविरूध्द भा.द. वि. कलम १७६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून याचा अधिक तपास पोलिस हवालदार साळुंखे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज