टीम मंगळवेढा टाईम्स । मुंबईत बुधवारी तब्बल 1,854 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,39,532 झाली आहे. तर, 28 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,502 वर पोचला आहे. 776 रुग्ण बरे होऊन घरी गेले. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा 81 टक्के इतका आहे.
आयसीएमआरच्या संकेतस्थळावर मुंबईतील कालच्या उर्वरित रूग्णांची नोंद केल्याने रूग्णांचा आकडा वाढल्याचे सांगण्यात आले.मुंबईत बुधवारी नोंद झालेल्या 28 मृत्यूंपैकी 22 जणांना दीर्घकालीन आजार होते.
मृतांमध्ये 19 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश होता. त्यापैकी 22 रुग्णांचे वय 60 हून अधिक होते. तर 6 रुग्ण 40 ते 60 वयोगटादरम्यान होते. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 1,12,743 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 93 दिवसांवर गेला आहे. 25 ऑगस्टपर्यंत एकूण 6,25,519 कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या. तर 19 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान रुग्णवाढीचा दर 0.75 टक्के इतका आहे.
मुंबईत 575 वस्त्या आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 5,666 आहे. गेल्या 24 तासात बाधितांच्या संपर्कात आलेले 2,627 संशयित मुंबईत आढळले आहेत.
1854 Coronation in Mumbai; The patient recovery rate is 81 percent
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज