टीम मंगळवेढा टाईम्स।
महाराष्ट्राच्या विरोधात घोषणाबाजी करीत कर्नाटकात जाण्याच्या घोषणा देणाऱ्या ग्रामपंचायती बरखास्त करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहेत.
त्यानुसार संबंधित ग्रामपंचायतींची माहिती मागविण्यात आलेली आहे. अशा सूचना तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
मागील काही दिवसांपासून अक्कलकोट तालुक्यातील तडवळ भागातील काही गावांनी महाराष्ट्र व कर्नाटक सीमावादात उडी घेतली होती. कर्नाटकात जाण्यासाठी ग्रामपंचायत ठराव पास करून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.
आळगे, शेगाव ही गावे अग्रभागी आहेत. राज्य विरोधी घोषणा देणे, कर्नाटकच्या बाजूने घोषणा देणे, झेंडा फडकावणे असे कृत्य काही ठिकाणी करण्यात आले आहे.
ज्या ठिकाणी आंदोलनं झाली आहेत, त्या गावांची माहिती संकलित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गटविकास अधिकारी सचिन खुडे माहिती संकलित करीत आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या.(स्रोत:लोकमत)
ठराव केलेल्या गावांची माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे
कर्नाटकात जाण्याविषयी ज्या- ज्या गावांनी आजवर ठराव केलेला आहे. अशा गावांची माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. माहिती संकलित करण्याच्या सूचना ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आळगे गावची माहिती प्राप्त झाली आहे. इतर गावांची माहिती प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल.-सचिन खुडे, गटविकास अधिकारी, अक्कलकोट,
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज