टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढयानजीक ऊसाच्या ट्रॅक्टरने मोटर सायकलस्वारास जोराची धडक देवून मोटर सायकलवरील सिध्दाप्पा रामचंद्र भोरकडे (वय 49 रा.पौट) याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅक्टरचालक पांडुरंग हणमंत भानवसे (रा.सौंदणे ता. मोहोळ) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान गेल्या दोन दिवसात ट्रॅक्टरचे दोन अपघात होवून दोघांचा बळी गेला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,काल दि.25 रोजी दुपारी 4.00 च्या दरम्यान लवंगी भैरवनाथ कारखान्याचा ऊस ट्रॅक्टर एम एच 13 जे.81 00 हा मंगळवेढा येथील मरवडे रोडवरील बायपास रोडच्या पुलाखाली भरधाव वेगाने अविचाराने आरोपीने ट्रॅक्टर चालवून एम एच 13 बी.एम.6285 या
मोटर सायकलवरील सिध्दाप्पा भोरकडे याला जोराची धडक देवून गंभीर जखमी करून मोटर सायकलचे तीन हजाराचे नुकसान करीत मोटर सायकलस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याने ट्रॅक्टरचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद लोकेश कांबळे यांनी दिली आहे.
दोन दिवसात ऊसाच्या ट्रॅक्टरने दोघांचा घेतला बळी
दरम्यान गेल्या दोन दिवसात ऊसाच्या ट्रॅक्टरने दोघांचा बळी घेतला आहे. यामध्ये शाळेवरून घरी जात असताना 14 वर्षीय शाळकरी मुलाचाही बळी गेला आहे.परिणामी झालेल्या
या दोन घटनांमुळे पालक व नागरिकांमधून संतापाचे वातावरण पसरले असून शहरात येणारी अवजड वाहतूक नगरपालिका व पोलिस प्रशासन यांनी तात्काळ थांबवावी अन्यथा नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज