टीम मंगळवेढा टाईम्स।
विरुद्ध दिशेने भरधाव वेगात जाऊन मोटरसायकलीस शनिवारी दुपारी समोरून जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
हा अपघात मंगळवेढ्यात बँक ऑफ महाराष्ट्र शाखेसमोर झाला. सूर्यकांत सदाशिव डांगे (वय ४२, रा. पाटखळ, ता. मंगळवेढा) असे मृताचे नाव आहे.
टिपर (एमएच १३, एएक्स ४९९०) चालक अजमुद्दीन अबीर पटेल (रा ब्रम्हपुरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद मृताचे वडील सदाशिव डांगे यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी शनिवारी दुपारी सूर्यकांत डांगेहा दुचाकीवर (एमएच १३ ईजी १८६३) एकटाच दामाजी चौकाकडून बोराळे नाकाकडे जात असता
विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिपरने भरधाव वेगात वाहन धडक दिली. त्यात सूर्यकांत जागीच ठार झाला. टिपर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज