टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील महालिंगराया देवस्थान समिती व यात्रा कमिटीच्या यात्रा काळातील दानपेटीमध्ये मोजणी तहसील कार्यालयातील सभागृहात सुरू होती,
यावेळी धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे शिंदे यांच्यासह दिवसभरात चलनी नोटा मोजल्या गेल्या. एकूण २१ लाख ५० हजार रुपये शनिवार अखेर जमा झाले असून
नाणी मोजण्याचे काम दोन दिवस चालणार असल्याची माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी बोलताना दिली.
५ लाख रुपयांच्या पावत्या मिळाल्या आहेत. सध्या महालिंगराया देवस्थान समिती व यात्रा कमिटीवर तहसीलदार अध्यक्ष म्हणून काम पाहत असून आर्थिक व्यवहार हे धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारित येत आहेत.
त्यामुळे यात्रा काळातील उत्पन्न हे ट्रस्टच्या खात्यावर (नावावर) बँकेत जमा करण्यात आले असून या पैशाचे यात्रा काळात येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर परिसरातील मूलभूत गरजा पुरवण्यासाठी करण्यात यावी अशी मागणी भक्तांकडून केली जात आहे.
कार्तिकी वारीपेक्षा जास्त भक्तांची संख्या या देवस्थानला भेट देत असताना देखील वाहनासाठी पार्किंगची सोय, शौचालय, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा देणे, पोलिस बंदोबस्त नेमणे आवश्यक आहे. भेटीच्या ठिकाणी ओढ्याच्या दोन्ही बाजूला घाट बांधणे अत्यावश्यक आहे.
दान धर्मादायकडे
गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत दुप्पट देणगी जमा झाली आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. धर्मादाय विभागाच्या ताब्यात सर्व रक्कम सुपूर्द केली आहे. – स्वप्निल रावडे , तहसीलदार
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज