टीम मंगळवेढा टाईम्स ।
नवतपातील उन्हाच्या प्रचंड कडाक्यामुळे अंगाची लाहीलाही होत असताना हवामान विभागाने मान्सूनची आनंदवार्ता दिली आहे. लवकरच मान्सून येणार असून, तळकोकणात म्हणजे रत्नागिरीत तो ४ जूनपर्यंत येण्याचा अंदाज वर्तविला आहे.
यंदा देशामध्ये १०६ टक्के पाऊस होईल, असा अंदाज देण्यात आला आहे. सध्या विदर्भ, मराठवाड्यात सूर्य चांगलाच तळपत आहे. त्या ठिकाणी अक्षरशः आग ओकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रचंड उकाडा जाणवत असल्याने नागरिक उष्णतेने त्रस्त आहे. मान्सून दाखल झाल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
‘रेमल’ या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरावरील मान्सून सक्रिय झालेला आहे. त्यामुळे मान्सूनला कुठेही अडथळा येणार नाही. केरळच्या पुढील वाटचाल चांगल्यारीतीने होणार आहे.
मान्सूनने यावर्षी अकरा दिवस अगोदरच पूर्वोत्तर राज्यांसह सिक्कीम आणि पश्चिम बंगालपर्यंत मजल मारलेली आहे. मान्सूनच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही शाखा रविवारपासून अधिक बळकट होतील. परिणामी मान्सूनची वेग चांगला राहील, असा अंदाज देण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज