टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.आमदार माने यांची पत्नी, मुलगी आणि त्याचे स्वीय सहायक यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
इंदापूर तालुक्यातील शेळगाव हे मोहोळचे लोकप्रतिनिधी असलेले माने यांचे मूळगाव आहे. पुण्यातील एका मित्राचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कात असल्याने आमदार माने यांनीही कोरोना तपासणी करून घेतली. त्यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.
माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. आज सकाळी रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने माझ्यावर उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती.
– आमदार.यशवंत (तात्या) माने,
मोहोळ मतदारसंघ – पक्ष प्रतोद, विधानसभा— Yashwant Mane (@YashwantManeNCP) August 24, 2020
खबरदारीचा उपाय म्हणून पत्नी आणि मुलीचीही तपासणी केली. त्या दोघींचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
या तिघांनाही कोरोनाचा कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला आहे. आमदार माने, पत्नी आणि मुलगी सध्या पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झालेले माने यांचे स्वीय सहायक निमगाव केतकी येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. आमदार माने हे कोरोना विषाणूच्या काळात मोहोळ मतदारसंघात नियमितपणे कामाचा आढावा घेत असतात.
Mohol NCP MLA Yashwant Mane contracted corona virus
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज