टीम मंगळवेढा टाईम्स ।
कर्ज फेडण्याकामी माहेरहून पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करीत डॉ.रश्मी बिराजदार यांना आत्महत्या करण्यास प्रवृत केल्याप्रकरणी पती व सासऱ्याविरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मुलीचे वडील मल्लिकार्जुन गुंडर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ४ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सासरा शंकर बिराजदार व पती संतोष बिराजदार असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकातील भैरीदेवरकप्पा (ता.हुबळी, जि. धारवाड) येथील मल्लिकार्जुन गंडूर यांची मुलगी डॉ. रश्मी व संतोष बिराजदार यांचा २०११ मध्ये विवाह झाला होता.
लग्नानंतर काही वर्षांपासून जावईवर खूप जास्त कर्ज झाले. तेव्हा माझे कर्ज फेडण्यासाठी वडिलांकडून पाच लाख रुपये घेऊन ये नाहीतर तुझे काही खरे नाही, असे रश्मी यांना धमकावल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर रोख रक्कम व पाच तोळे सोने सासऱ्यांना दिले होते.
नंतर संतोषला दारूचे व्यसन लागले. तो रात्री उशिरा घरी येतो, त्याने पुन्हा कर्ज केले आहे, कर्ज फेडण्यासाठी पैसे आण म्हणून मला मारहाण करतो, असे रेश्मा माहेरी सांगत होती.
दरम्यान, काही नातेवाइकांसह संतोष व त्याच्या वडिलांची समक्ष भेट घेऊन दारूच्या आहारी जाऊ नका असे समजावून सांगून सध्या झालेले कर्जही मी फेडतो; परंतु दारूचे व्यसन सुटेपर्यंत त्यांचे नावावर असलेली जमीन व घर हे डॉ रश्मी व नातवंडांच्या नावावर करा, असे सुचवले होते.
याला ते दोघेही तयार झाले होते. त्यामुळे आम्ही पैशांची जुळवाजुळव केली. दरम्यान सासऱ्याच्या त्रासाला व छळाला कंटाळून डॉ. रश्मीने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी पती व सासरा या दोघांवर भा दं. वि८५, १०८ प्रमाणे गुन्हा दाखला करण्यात आला आहे. अधिक तपासा पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कर्णेवाड करत आहेत.
मुलीचे शिक्षण कन्नड भाषेत.. फिर्यादीत उल्लेख
पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत चिठ्ठीविषयी मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे की, डॉ. रश्मी बिराजदार यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली मराठी भाषेतील चिठ्ठी दाखवली. ती आमचे मराठी वाचता येणारे नातेवाइकांनी मला वाचून दाखविली. त्यामध्ये माझी मुलगी रश्मी हिने “माझ्या मरणाला कोणी कारणीभूत नाही.
माझ्या मुलांना संभाळा, भांडू नका वगैरे” मजकूर लिहिला असल्याचे सांगितले. माझे मुलीचे शिक्षण कन्नड भाषेतून झाले आहे. ती मराठी भाषा लिहिण्यास कधी शिकली हे मला माहीत नाही.
तिने सदर चिठ्ठीमध्ये तिचे मरणाला कोणी कारणीभूत नाही. असे तिचे मुलांचे भवितव्याचा विचार करून लिहिले असावे, असा उल्लेख मुलींच्या वडिलांनी फिर्यादीत केला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज