टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 5 मधून भाजप पक्षाच्या नगरसेवक पदासाठीच्या अधिकृत उमेदवार मोहमदमुस्तफा मुलाणी व संध्या कोंडूभैरी यांच्याकडून प्रभागामध्ये जोरदार प्रचार करण्यात आला. त्यांच्या प्रचाराला महिला भगिनींची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
भाजप पक्षाने यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर मोहमदमुस्तफा मुलाणी व संध्या कोंडूभैरी यांच्याकडूनही प्रभागामध्ये प्रचार सुरु करण्यात आला.

यावेळी त्यांच्यासोबत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुजाता अजित जगताप उपस्थित होत्या. दोन्ही उमेदवार एकाच वेळी प्रभागामध्ये आल्यामुळे नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जात त्यांच्या भेटीगाठी घेत उमेदवारांकडून त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यात आल्या. तसेच प्रभागाबद्दलचे असलेले विकासाचे स्वप्न त्यांच्यापुढे मांडण्यात आले. त्यामुळे एक विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला.

मंगळवेढा नगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 5 हा सर्वात मोठा भाग असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. त्यामुळे प्रत्येक घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न मोहमदमुस्तफा मुलाणी व संध्या कोंडूभैरी करीत आहेत.
यावेळी प्रत्येक घरामध्ये नागरिकांकडून उमेदवारांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. महिला भगिनींकडून त्यांचे औक्षण करण्यात आले.

यावेळी प्रर्भागात असणाऱ्या लहान मोठ्या सर्व समस्यांची सोडवणूक करण्यासाठीचे व्हिजन मोहमदमुस्तफा मुलाणी व संध्या कोंडूभैरी यांनी नागरिकांसमोर मांडले. त्यासोबत सुजाता जगताप यांनी देखील प्रभागाचा विकास नियोजनबद्धरित्या करण्यासाठीचा विश्वास व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक 5 मध्ये असणारी कचऱ्याची समस्या, सार्वजनिक शौचालयाची समस्या, रस्ते समस्या सोडविण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात आले असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणार असल्याचे, मोहमदमुस्तफा मुलाणी व संध्या कोंडूभैरी यांच्याकडून सांगण्यात आले.
यावेळी उपस्थित महिला भगिनींनी प्रभाग क्रमांक 5 मधून मोहमदमुस्तफा मुलाणी व संध्या कोंडूभैरी आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुजाता जगताप विक्रमी मतांनी निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













