मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमीच कुठल्या नी कुठल्या योजना घेऊन येत असते त्यातच एक नवीन म्हणजे आता शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने खूप मोठं पाऊल उचललं आहे. मोदी सरकार आता देशभरात 10 हजार 845 माती परीक्षण प्रयोगशाळा उभारणार आहे. कारण त्याचा शेतकऱ्यांना आपल्या शेतीची मशागत करताना योग्य प्रकारे खतं वापरू शकेल. त्यामुळे शेतकऱ्याचा रासायनिक खतांवरचा खर्च हा कमी करून उत्पन्न वाढवण्याची जबाबदारी या प्रयोगशाळांना दिली जाईल.
तसेच या प्रयोगामुळे शेतामध्ये वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांचा वापर हा कमी होईल
तसेच यामुळे शेतकऱ्यानां जो मशागतीसाठीचा खर्च लागतो तो ही कमी होहील आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनही वाढणार आहे. शेतीचं उत्पन्न विषमुक्त होण्यालाही यामुळे मदत होणार आहे. सध्याची परिस्थीतीमध्ये या प्रयोगशाळा खूप कमी आहेत. तसेच जेव्हा पासून मोदी सरकार आले आहे तेव्हा पासून शेतीकडे मोठ्याप्रमाणावर लक्ष दिल्या जात आहे.
तसेच देशातील ह्या प्रयोग शाळा आपल्याला पुरेश्या नाहीत त्यामुळे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या म्हणण्यानुसार 10 हजार 845 प्रयोगशाळांना मंजूरी देण्यात आली आहे. तसेच ते म्हणाले की, मृदा स्वास्थ कार्ड योजनेवर 2014 पासून 2020 पर्यंतचे बजेट हे 1122 कोटी रुपये आहे.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज