mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी योजना,15 लाख रुपये मिळणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी योजना,15 लाख रुपये मिळणार


मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मोदी सरकार शेतकरी आणि शेतीच्या विकासासाठी त्यांच्या गटाला 15-15 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देणार आहे. यासाठी त्यांना एक कंपनी म्हणजे शेतकरी उत्पादक संघटना (ऋरीशी झीर्वीलशी जीसरपळीरींळेप) बनवावी लागेल. सरकारने 10,000 नवे शेतकरी उत्पादक संघटना बनवण्याची परवानगी दिली आहे. 

पुढील 5 वर्षात यावर 4,496 करोड रुपये खर्च होतील. याचे रजिस्ट्रेशन कंपनी अ‍ॅक्टमध्येच होईल, यामुळे यातून ते सर्व फायदे मिळतील जे कंपनीला मिळतात. या संघटना कोऑपरेटीव्ह पॉलिटिक्सपासून एकदम वेगळ्या असतील, म्हणजे या कंपन्यांवर कोऑपरेटीव्ह अ‍ॅक्ट लागू होणार नाही.

सर्वसामान्य शेतकर्‍यांना थेट फायदा
एफपीओ लघु व मध्यम शेतकर्‍यांच्या गट असेल, यातील शेतकर्‍यांना आपल्या शेतीमालासाठी बाजार मिळेल तसेच खत, बीयाणे, औषधे आणि कृषी उपकरणे खरेदी करणे सोपे जाणार आहे.सर्व सेवा स्वस्त मिळतील आणि दलालांच्या जाळ्यातून त्यांची सुटका होईल.

जर एकटा शेतकरी आपला शेतीमाल विकण्यासाठी गेला, तर त्याचा फायदा दलालांना, अडत्यांना मिळतो. एफपीओ सिस्टममध्ये शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनांचा चांगला भाव मिळतो, कारण बारर्गेनिंग कलेक्टिव्ह असेल.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यानुसार हे 10,000 नवे एफपीओ 2019-20 पासून 2023-24 पर्यंत बनवले जातील. यातून शेतकर्‍यांची सामुहिक शक्ती वाढेल.

कसे मिळणार 15 लाख रुपये
राष्ट्रीय शेतकरी महासंघाचे संस्थापक सदस्य विनोद आनंद यांनी सांगितले की, सर्वात आधी अटल बिहारी वाजपेयी सरकारने एफपीओ बनवण्यासाठी प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. वायके अलघ यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली होती. याअंतर्गत 11 शेतकरी संघटीत होऊन आपली अ‍ॅग्रीकल्चर कंपनी बनवू शकतात. मोदी सरकार जे 15 लाख देण्याचे बोलत आहे, ते कंपनीचे काम पाहून तीन वर्षात दिले जातील.

एफपीओ बनवून पैसे घेण्याच्या अटी

(1) जर संघटना मैदानी क्षेत्रात काम करत असेल तर किमान 300 शेतकर्‍यांचा त्यामध्ये सहभाग असावा. म्हणजे एका बोर्ड मेंबरवर कमीत कमी 30 लोक सामान्य सदस्य असावेत. यापूर्वी 1000 होते.

(2) डोंगर भागातील कंपनीसोबत 100 शेतकर्‍यांनी येणे जरूरी आहे. त्यांना कंपनीचा फायदा मिळाला पाहिजे.

(3) नाबार्ड कन्स्ल्टन्सी सर्व्हिसेस तुमच्या कंपनीचे काम पाहून रेटिंग करेल, त्या आधारावर निधी मिळेल.

(4) बिझनेस प्लॅन पाहिला जाईल की, कंपनी कोणत्या शेतकर्‍यांना फायदा देऊ शकत आहे. त्या शेतकर्‍यांच्या उत्पादनाला मार्केट उपलब्ध करून देते किंवा नाही.

(5) कंपनीचा गव्हर्नन्स असा असेल – बोर्ड ऑफ डायरेक्टर केवळ कागदावर आहेत की ते काम करत आहेत. ते शेतकर्‍यांचा माल बाजारात पोहचण्यासाठी काम करत आहेत किंवा नाही.

(6) जर एखादी कंपनी आपल्या कंपनीतील शेतकर्‍यांना आवश्यक वस्तू म्हणजे बीयाणे, खत आणि औषधे दत्यादीचे कलेक्टिव्ह खरीदी करत असेल तर तिचे रेटींग चांगले होऊ शकते. कारण यामुळे शेतकर्‍यांना स्वस्त सामान मिळेल.

काय आहे एफपीओ
एफपीओ म्हणजे शेतकरी उत्पादक संघटना जो शेतकर्‍यांचा एक गट असेल, जो कृषी उत्पादन कार्यात काम करत असेल आणि कृषी संबंधी व्यवसायिक कामे करत असेल. एक गट तयार करून तुम्ही तुमची कंपनी अ‍ॅक्टमध्ये रजिस्टर्ड करू शकता.

सध्या किती शेतकरी कंपन्या
एफपीओचे संघटनाला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी लघु कृषक कृषी व्यापार संघ आणि राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक काम करत आहेत. दोन्ही संस्थांचे मिळून सुमारे पाच हजार एफपीओ रजिस्टर्ड आहेत. मोदी सरकार हे आणखी वाढवणार आहे. यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगमला (एनसीडीसी) सुद्धा जबाबदारी देण्यात आली आहे.

जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videsh

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
तुंगत येथे एकाच रात्री तीन घरफोड्या

तुंगत येथे एकाच रात्री तीन घरफोड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

ऐतिहासिक निर्णय! मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासाचा ‘संकल्प’; सुनंदा आवताडे यांचा मास्टरप्लॅन; विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवण्याचे आवाहन

February 10, 2026
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

सुवर्ण महोत्सवी शिवगर्जना! मंगळवेढ्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

February 10, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

मोठी बातमी! अखेर भारत- पाकिस्तान सामना होणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार; पीसीबी-आयसीसीच्या बैठकीनंतर निर्णय

February 9, 2026
हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

February 9, 2026
गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

February 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा