mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आ.तानाजी सावंत आले रुग्णांच्या मदतीला धावून;१ हजार खाटांचे मोफत जम्बो कोविड केअर सेंटर केले सुरू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 7, 2021
in राज्य, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स । देवानंद पासले

कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांवर मोठा भार पडत आहे. परंतू आ.प्रा.तानाजी सावंत यांनी शासनाची कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता स्वखर्चातून बार्शी येथे १ हजार बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करून ग्रामीण भागाच्या दृष्टीने या सेंटरच्या माध्यमातून अतिशय चांगली व्यवस्था निर्माण केली आहे.

तसेच शासन व स्थानिक स्वराज्य संस्थेचेवर आरोग्य यंत्रणेचा वाढणारा ताण कमी करण्यासाठी शासनाला एक प्रकारे मदत करून हातभार लावला असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगर विकास तथा सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

बार्शी येथील जेएसपीएम ग्रुप संचलित भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयात १००० खाटांचे जम्बो कोविड केअर सेंटरचे नगर विकास तथा सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दि.७ मे रोजी शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी शिवसेनेचे सचिव तथा मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. प्रा. तानाजी सावंत, आ. राजेंद्र राऊत, आ. ज्ञानराज चौगुले, माजी मंत्री दिलीप सोपल, प्रा. शिवाजीराव सावंत, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शामलताई वडणे, बार्शीचे नगराध्यक्ष ॲड. असिफ तांबोळी,

शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, राजेंद्र मिरगणे, नगरपरिषदेचे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष सुरज साळुंके, गौतम लटके, प्रशांत चेडे, भूम नगर परिषदेचे संजय गाढवे, बार्शीचे तहसिलदार सुरेश शेरखाने, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, डॉ. दिग्गज दापके, केंद्र समन्वयक विकासरत्न प्रा. तानाजीराव सावंत विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे,कृष्णदेव लोंढे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना मंत्री शिंदे म्हणाले की, बार्शी या ठिकाणी शिवसेनेचे आ. तानाजी सावंत यांनी सोलापूर व उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची सोय करण्यासाठी बार्शी येथे १ हजार बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील रुग्णांना उपचार घेण्यासाठी बेड मिळत नाहीत अशा तक्रारी यामुळे कमी होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे.

तसेच ‌या कोविड केअर सेंटरमध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम असून महिला रुग्णांसाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील फार मोठी अडचण दूर झाली असल्याचे सांगून ते म्हणाले की, या ठिकाणी सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना रुग्णांच्या रक्ताच्या वेगवेगळ्या ८ चाचण्या मोफत केल्या जाणार असल्यामुळे तात्काळ निदान होण्यास मदत होणार आहे. तसेच यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढण्यामध्ये देखील मोठा फायदा होणार असून रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी योगाच्या प्रशिक्षित शिक्षकांची देखील या ठिकाणी टीम कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

तर हे सेंटर नैसर्गिक व मोकळ्या वातावरणात असल्यामुळे रुग्ण लवकरात लवकर बरा होऊन घरी जाण्यासाठी याचा सर्वात मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आ.‌सावंत यांनी अशा प्रकारची व्यवस्था करून शासनाला हातभार लावण्याबरोबरच सहकार्य केले असून ग्रामीण भागातील रुग्णांची सर्वात मोठी असलेली अडचण दूर होणार असल्यामुळे ही व्यवस्था रुग्णांना खरोखरच आरोग्यदायी दिलासा देणारी ठरणारी असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

पुरुष व महिला रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था
या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी येणाऱ्या पुरुष व महिला रुग्णांची स्वतंत्र सोय केली असून महिला रुग्णांसाठी १५० व पुरुष रुग्णांसाठी ८५० बेड्स उपलब्ध करुन दिले आहेत. विशेष म्हणजे स्वतंत्र एका रूममध्ये तीन रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांना पिण्याचे शुद्ध पाणी, म्युझिक थेरपी, स्नानासाठी गरम पाणी, योग प्राणायाम आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

तज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी कार्यरत
या कोविड केअर सेंटरमध्ये १८ तज्ञ डॉक्टर्स, ४२ नर्सेस व ८० स्वच्छता कर्मचारी २४ तास कार्यरत आहेत. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांस भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना ठराविक वेळ निश्चित करण्यात आली असून शारीरिक सुरक्षित अंतरा बरोबरच त्रिसूत्रीचा अवलंब करण्यात येणार आहे.

तसेच ऑक्सिजनयुक्त २ ॲम्बुलन्स उपलब्ध आहेत. रुग्णांना पौष्टीक व सकस नाष्टा, वेळचे जेवण, दोन वेळी चहा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आमदार .प्रा.सावंत आले रुग्णांच्या मदतीला धावून

आ. प्रा. तानाजीराव सावंत यांचे‌ राजकारणा व्यतिरिक्त सामाजिक कार्य खूप मोठे असून त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्याची दुष्काळी ओळख पुसून टाकण्यासाठी बाळासाहेब ठाकरे शिव जलक्रांती योजना राबवून पाणी अडवा व पाणी जिरवा हे प्रत्यक्ष कृतीद्वारे काम केल्यामुळे अनेक ठिकाणच्या ओसाड शेतीचे नंदनवन झाले आहे.

तर उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयास ५ ऑक्सीजन ड्युरा सिलेंडर उपलब्ध करून देऊन रुग्णांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. तर बार्शी येथे १ हजार खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करून रुग्णांना खरोखरच आरोग्यदायी दिलासा दिला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.तानाजी सावंतकोविड सेंटरसोलापूर

संबंधित बातम्या

सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

मित्रानेच मित्राचा विश्वासघात केला! व्यापाराच्या दुकानात बसायचा, संधी साधून पैसे खिशात टाकायचा; धक्कादायक प्रकार उघड

December 13, 2025
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

तारीख पे तारीख! भाजप आमदार समाधान आवताडेंनी सरकारवरच राग काढला; थकीत बिलांचा मुद्दा पेटला; नेमके काय आहे प्रकरण?

December 13, 2025
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर; ‘ही’ आहेत योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

December 13, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटलांना राजकीय पक्षाकडून आता थेट अध्यक्षपदाची ऑफर; राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार?

December 13, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठी अपडेट, निवडणूक आयोगाने निर्णय कळवला; इच्छुकांची धडधड वाढली

December 13, 2025

नागरिकांनो! ‘या’ दिवशी आठवडा बाजार राहणार बंद; मतदान केंद्राच्या १०० मीटर परिघात प्रवेश करण्यास निर्बंध

December 13, 2025
बांधकाम मटेरियल तपासून देण्यासाठी लाच स्वीकारताना महिला अभियंत्यांसह दोघांना रंगेहात पकडले

मोठी बातमी! तलाठींच्या गैरव्यवहारामुळे मंगळवेढ्यात शेतकऱ्यांना त्रास; जिल्हाधिकाऱ्यांनी केली त्वरित निलंबनाची कारवाई

December 12, 2025
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

सोलापूर जिल्ह्यात कृत्रिम वाळू निर्मिती केंद्रे उभारली जाणार; ‘या’ तारखेपर्यंत ऑफलाइन प्रस्ताव दाखल करण्याची सूचना; शासनाने नवीन धोरण केले जाहीर

December 13, 2025
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

भामटेपणाचा कहर! सिस्टीममध्ये फेरफार करून ‘या’ परीक्षेमध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष, १ कोटी १० लाख रुपये उकळले; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार; विद्यार्थी, पालकांनो सावधान

December 12, 2025
Next Post
कोरोना लसीचा डोस घेतल्यावर ‘हे’ पिता येणार नाही?.वाचा सविस्तर

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 'या' ठिकाणी होणार 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना कोरोना लसीकरण

ताज्या बातम्या

सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

मित्रानेच मित्राचा विश्वासघात केला! व्यापाराच्या दुकानात बसायचा, संधी साधून पैसे खिशात टाकायचा; धक्कादायक प्रकार उघड

December 13, 2025
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

तारीख पे तारीख! भाजप आमदार समाधान आवताडेंनी सरकारवरच राग काढला; थकीत बिलांचा मुद्दा पेटला; नेमके काय आहे प्रकरण?

December 13, 2025
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर; ‘ही’ आहेत योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

December 13, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत मतदारांचे लाड, मतांसाठी उमेदवारांनी अक्षरशः खादाडी स्पर्धाच केली सुरू; जेवणावळी, मसाला दूध.. आता पुढे काय? नागरिकांमध्ये लागली उत्सुकता

December 13, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटलांना राजकीय पक्षाकडून आता थेट अध्यक्षपदाची ऑफर; राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार?

December 13, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठी अपडेट, निवडणूक आयोगाने निर्णय कळवला; इच्छुकांची धडधड वाढली

December 13, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा