टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपुर विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेतली असून मतदार संघातील विकासासंदर्भात व कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी इंजेक्शन व सर्व औषधांचा कोटा वाढवून देण्याची मागणी केली. तसेच 35 गावच्या पाणी संदर्भात चर्चा झाली असून यावर लवकरच निधी देण्याची मागणी आ.समाधान आवताडे यांनी केली आहे.
यावेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर, आ.प्रशांत परिचारक, आ.रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत,आ.सचिन कल्याणशेट्टी, आ.राम सातपुते,आ.जयकुमार गोरे,जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सोलापूर जि.प.बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, बारबोले(दादा) ,अविनाश मोरे,भारत निकम, स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर बळवंतराव आदीजन उपस्थित होते.
राज्यात पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक चांगलीच गाजली. भाजप आणि राष्ट्रवादीसाठी ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची ठरली होती. दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का देत भाजपने सरशी मारली.
नवनियुक्त आमदार समाधान आवताडे यांचा आज राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्कार केला याप्रसंगी आवताडे बोलत होते.
आ.आवताडे म्हणाले की,निकालानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणीस यांनी सांगितले होते की, तुम्ही माझ्याकडे येण्यापेक्षा तुमच्या मतदार संघातच काम करत राहा.
आम्ही त्याच पद्धतीने काम करत राहिलो माझ्या विजयासाठी देवेंद्र फडणीस यांच्यासह अनेकांनी मला साथ दिलेली आहे त्यामुळे आज आम्ही सर्वजण देवेंद्र फडणीस यांचा सत्कार करण्यासाठी आलो आहे.
आ.जयकुमार गोरे म्हणाले की, समाधान आवताडे यांचा विजय आम्ही साजरा केलेलाच आहे, भविष्याचा राजकारणामध्ये नेत्यांनी आम्हाला शब्द दिला होता पंढरपूरचा करेक्ट कार्यक्रम करा,
मी सरकारचा कार्यक्रम करेक्ट करतो त्या दृष्टीने आम्ही आमची जबाबदारी पार पाडली आहे. नेत्यांनीही कामगिरी पार पडायचा निश्चित केला आहे त्यामुळे लवकरच भाजप सत्तेत येणार आहे.
भाजप उमेदवार समाधान आवताडे यांचा विजय झाल्यानंतर भाजपची ताकद लक्षात आलीच पण राष्ट्रवादीसाठी हा मोठा इशारा ठरला.
अखेर पंढरपुरातील या प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपने मुसंडी मारली आणि समाधान आवताडे विजयी झाले. भाजपसाठी हा विजय अनेक अर्थांनी विशेष, मोठा मानला जातो. तर महाविकासआघाडी आणि राष्ट्रवादीचा हा पराभव म्हणजे मोठा धक्का आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज