टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा पंढरपूर विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश डांगे यांनी आमदार आवताडे यांच्या दीर्घ आयुष्यासाठी नंदेश्वर, रड्डे, लवंगी, खरसुंडी, हुन्नूरमध्ये विविध सामाजिक सेवेचे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

आज दि.21 नोव्हेंबर रोजी श्री.बाळकृष्ण महाराज नंदेश्वर येथे आमदार महोदय यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी 7 वा. अभिषेक.

सकाळी 9 वाजता श्री लक्ष्मी देवी बन रड्डे येथे आमदार महोदयांना उदंड आयुष्य लाभो यासाठी अभिषेक.


सकाळी 10.30 वाजता जिल्हा परिषद शाळा नंदेश्वर व जिल्हा परिषद शाळा झारेवाडी येथे विद्यार्थ्यांना वही पुस्तक पेन वाटप करण्यात येणार आहे.

तसेच पशुवैद्यकीय दवाखाना नंदेश्वर येथे लिव्हर टॉनिक व जनावरांचे जंत निर्मूलन

औषध मोफत सकाळी 11:30 वाजता देण्यात येणार आहेत.

दुपारी 12 वाजता हुन्नूर दत्त आश्रम मठ या ठिकाणी प्रार्थना व अभिषेक आमदार महोदयांना उदंड आयुष्य लाभो यासाठी


दुपारी 1.30 वाजता लवंगी येथील मतीमंद शाळेत अन्नदान व खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ देवस्थान येथे आमदार महोदय यांच्या

पुढील वाटचालीच्या शुभेच्छा साठी सायं. 4 वा. प्रार्थना व अभिषेक करण्यात येणार

असल्याची माहिती मंगळवेढा तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश डांगे यांनी दिली आहे.

दरम्यान, मंगळवेढा तालुक्यात प्रथमच आपल्या लाडक्या नेत्यासाठी असा उपक्रम आकाश डांगे यांनी हाती घेतला आहे. या उपक्रमाचे संपूर्ण जिल्हाभर चर्चा सुरू आहे.


आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगाव येथे तीन दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगाव येथे सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांनी परिपूर्ण अशा तीन दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज दि. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिर घेण्यात येणार असून, त्यानंतर साडे दहा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व कै. दत्ताजीराव भाकरे प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, आंधळगाव येथे विद्यार्थ्यांना खाऊवाटप आणि पर्यावरणपूरक वृक्षवाटपाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
दुसऱ्या दिवशी, दि. २२ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व कै. दत्ताजीराव भाकरे प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, आंधळगाव येथे निबंध स्पर्धे चे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांना आपली लेखनकौशल्ये दाखविण्याची संधी मिळणार आहे.
दि. २३ नोव्हेंबर रोजी भव्य वनडे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील विविध संघ यात सहभागी होणार असून क्रीडारसिकांसाठी हा दिवस आकर्षणाचा ठरणार आहे.
या कार्यक्रमांचे आयोजन दामाजी शुगरचे माजी संचालक सुरेश भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून आमदार समाधान आवताडे यांचे खंदे समर्थक युवक नेते निलेश आवताडे, उद्योजक तनवीर मुलाणी,
युवा नेते दिनकर भाकरे, ग्रामपंचायत सदस्य समाधान लेंडवे, राजू डांगे, विकास क्षीरसागर, भाजपा तालुका उपाध्यक्ष आप्पासो स्वामी यांनी नियोजनात सक्रिय भूमिका बजावली आहे.
तरी आमदार समाधान आवताडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या पंचक्रोशीतील समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निलेश आवताडे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












