मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण जनतेला भेडसावत असलेल्या अडचणी व त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आ. समाधान आवताडे यांनी अधिकारी व पदाधिकारी यांच्यासमवेत आज गुरुवार ६ जुलै ते ९ जुलै या चार दिवसीय दौऱ्याचे आयोजन केले आहे. या दौऱ्यात नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याची माहिती आ.समाधान आवताडे यांनी दिली.
मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांमध्ये सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने असणाऱ्या निरनिराळ्या अडचणी, मूलभूत व पायाभूत प्रगतीच्या संदर्भात असणारे प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यासाठी व
त्यावरती आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांचा तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे प्रशासकीय अधिकारी, प्रमुख पदाधिकारी यांचे समवेत मंगळवेढा तालुक्यातील पुढील गावांमध्ये नियोजित रूपरेषेनुसार दौरा संपन्न होणार आहे.
गुरुवार दि ६जुलै २०२३ रोजी सकाळी ८.३०वाजता पाटखळ, ९.३०वाजता जुनोनी, १०.१५वाजता नंदेश्वर, ११.१५वाजता भोसे, दुपारी १२.१५वाजता हुन्नूर त्यानंतर दुपारी २.३०वाजेपर्यंत राखीव,
दुपारी २.३०वाजता महमदाबाद हु., ३.१५वाजता लोणार, सायंकाळी ४.००वाजता पडोळकरवाडी, ४.४५वाजता रेवेवाडी,५.३०वाजता मानेवाडी, ६.३०वाजता खडकी.
शुक्रवार, दिनांक ७जुलै २०२३ रोजी सकाळी ८.३०वाजता हिवरगांव,९.१५वाजता खोमनाळ १०.००वाजता भाळवणी,११.००वाजता निंबोणी, दुपारी १२.वाजता चिक्कलगी,
१२.४५वाजता मारोळी, त्यानंतर दुपारी २.३०वाजेपर्यंत राखीव,२.३०वाजता शिरनांदगी, ३.३०वाजता रड्डे, ४.३०वाजता सिद्धनकेरी, ५.१५वाजता जालिहाळ, ६.००वाजता हाजापूर, ६.४५वाजता डोंगरगाव.
शनिवार दिनांक ८जुलै २०२३रोजी
सकाळी ८.३०वाजता येड्राव,९.१५वाजता खवे, १०.००वाजता जित्ती, १०.४५वाजता बावची , ११.३०वाजता जंगलगी,
दुपारी १२.१५वाजता सलगर खु,दुपारी २.३०वाजेपर्यंत राखीव, २.३०वाजता सलगर बु ,३.३०वाजता लवंगी, ४.३०वाजता आसबेवाडी, सायंकाळी ५.१५वाजता शिवणगी, ६.०० वाजता सोड्डी.
रविवार, दिनांक ९ जुलै २०२३ रोजी सकाळी ८.३०वाजता फटेवाडी ,९.१५वाजता तळसंगी , १०.००वाजता मरवडे ,११.००वाजता बालाजीनगर, ११.४५ वाजता कात्राळ, दुपारी १२.३० वाजता कर्जाळ,
दुपारी २.३०वाजेपर्यंत राखीव, २.३०वाजता कागष्ट,३.१५वाजता डिकसळ लवंगी, ४.००वाजता माळेवाडी, सायंकाळी ४.४५वाजता पौट, ५.३० वाजता येळगी, ६.१५वाजता हुलजंती
अशा रूपामध्ये सलग ४ दिवसांचा आ.आवताडे यांचा गावभेट दौरा संपन्न होणार आहे. तरी सदर गावातील ग्रामस्थ मंडळींनी या गावभेट दौऱ्यादरम्यान आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक अडी-अडचणी लेखी स्वरूपात मांडाव्यात असे आवाहन आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज