टीम मंगळवेढा टाईम्स।
गतवर्षी पाऊसकाळ कमी झाल्यामुळे मंगळवेढा तालुक्यामध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती उद्भवली आहे जनावरांना व माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
मुबलक चारा उपलब्ध नसल्यामुळे अव्वाच्या सव्वा किमतीने मिळेल तिथून चारा आणावा लागत आहे या सगळ्या बाबींचा आढावा घेण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील सर्व विभागांची टंचाई बैठक घेणे गरजेचे असून
आचारसहिता असल्याकारणाने बैठक घेण्यास परवानगी द्या अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे.
नुकतेच लोकसभा निवडणुकीचे मतदान झाले असून महाराष्ट्रातील निवडणुकांचा टप्पा संपला आहे मात्र 4 जून या मतमोजणीच्या दिवसापर्यंत देशात आचारसंहिता लागू आहे अशा परिस्थितीमध्ये अनेक निर्णय घेता येत नसून
आचारसहिता असल्याने अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधता येत नाही तरी टंचाई आढावा बैठक घेऊन तालुक्यातील सुरू असलेल्या, बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना म्हैसाळचे पाणी, टेंभू योजनेचा आढावा, मजुरांच्या हाताला काम देणे,
जनावरांच्या व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात उपाययोजना करणे,जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चारा डेपो किंवा चारा छावणीचे प्रस्ताव तयार करणे अशा अनेक बाबींसंदर्भात आढावा बैठक घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे.
त्यासाठी सर्व विभागांचा अधिकाऱ्यांसमवेत व गावोगावच्या पदाधिकाऱ्यांसोबत एकत्रित बैठक घेऊन आढावा घेण्यासाठी आपण परवानगी द्यावी व आपण स्वतः या बैठकीस उपस्थिती दर्शविण्याची विनंती केली असल्याचे निवेदन आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज