टीम मंगळवेढा टाईम्स ।
मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर गावातील मिस्टर सरपंचाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यातील तांडोर गावात घडली आहे.
मिस्टर सरपंच सिद्धेश्वर धुळाप्पा मळगे यांनी केलेल्या हल्ल्यात इरफान दिलावर सवाळे (वय 35 रा.तांडोर) हा शेतकऱ्याच्या डोळ्याच्या खाली गंभीर जखम झाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.15 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शेतकरी सवाळे हे भिमानदीच्या काठावर तांडोर गावच्या हद्दीत शेतात मोटार चालु करण्यासाठी नदीवर गेले होते.
त्यावेळी मिस्टर सरपंच सिद्धेश्वर धुळाप्पा मळगे याने तु मोटार चालु करायची नाही, इकडे यायचे नाही ही तुझी मोटर चालु करण्यासाठी माझ्या शेताच्या हद्दीतुन जायचे नाही असे म्हणून शिवीगाळी करुन
हाताने मारहाण करुन तेथेच पडलेला लोखंडी रिंगपाना हातात घेवुन त्याने फिर्यादीला उजव्या डोळ्याचे खाली मारुन जखमी केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज