टीम मंगळवेढा टाईम्स।
फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन देखील तीन वर्षांनंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल न केल्याबद्दल चालू असलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख अॅड. राहुल घुले, दत्तात्रय खडतरे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयासमोर कार्यालयावर धडक मोर्चा सोमवारी काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी, डोंगरगाव येथील लक्ष्मी कृषी विकास कंपनीने शेतकऱ्यांची दिशाभूल करुन कागदपत्राचा बनावट वापर करून शेतकऱ्यांच्या नावे करोडो रुपयाचे कर्ज काढलेली आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या व त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मंगळवेढा पोलिस स्टेशनमध्ये त्याची चौकशी गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. परंतु मंगळवेढा पोलिस स्टेशन च्या तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले नाही.

यामुळे आरोपींना न्यायालयात फायदा होईल म्हणून प्रांताधिकारी कार्यालयासमोर सोमनाथ साखरे, भारत माने, अमोल शिंदे, केशव साखरे हे पाच दिवसांपासून बेमुदत उपोषण करीत आहेत. प्रशासनांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

दामाजी चौकातून आज मोर्चा
या उपोषणकर्त्यांच्या मागण्या एकदम रास्त असून, गेली पाच दिवस उपोषणकर्त्यांकडे पोलिस प्रशासनांनी दुर्लक्ष केले आहे. पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे उपोषणकर्त्यांच्या न्याय मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दामाजी चौकातून धडक मोर्चाला सुरुवात करून उपोषण स्थळी समारोप केला जाईल. – अॅड. राहुल घुले, पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्ष स्वाभिमानी.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










