मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा नगर वाचनालय यांच्या विद्यमाने उद्या रविवार दि.16 जुलै रोजी सकाळी 10 वाजता नगर वाचनालयाच्या हॉलमध्ये
संगणक क्षेत्रातील वाटा या विषयावर अमेरिकेत वास्तव केलेले संगणक तज्ञ मिलिंद जोशी (पुणे) यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.
सध्या मंगळवेढा शहरातील व तालुक्यातील इयत्ता 10 वी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्याकरीता कॉम्प्यूटर करियर करुन परदेशात व देशात जॉब मिळविण्यासाठी मार्गदर्शन होणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष वर्षा मोडक यांनी केले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रांसचा सर्वोच्च नागरी, लष्करी पुरस्कार देऊन गौरव
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. भारतीय समुदायाला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान मोदी रात्रीच्या जेवणासाठी एलिसी पॅलेसमध्ये पोहोचले. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन आणि फ्रेंच फर्स्ट लेडी ब्रिजिट मॅक्रॉन यांनी येथे त्यांचे स्वागत केले.
मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींसाठी एका खासगी डिनरचे आयोजन केले होते. यावेळी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनरने सन्मानित केले आहे
मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या डिनरवर पंतप्रधान मोदींनी आनंद व्यक्त केला. एलिसी पॅलेसमध्ये खाजगी डिनर आयोजित केल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि फर्स्ट लेडीचा आभारी आहे, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट केले की, राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर देऊन सन्मानित केले आहे. हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज