पंढरपूर । राजेंद्र फुगारे
सहकार शिरोमणीची निवडणूक चांगलीच चुरशीची होत चालली आहे. दोन्ही बाजूकडून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच सत्ताधारी काळे गटावर कारखान्याकडून देणी न दिल्याचा मोठा ठपका येत आहे. अशातच काळे यांना सावरण्यासाठी विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनीही पुढाकार घेतला आहे.
पण ज्यांना स्वतःच जमल नाही. स्वतः थकबाकीदार असताना त्यानी आता दुसऱ्याला जामीन होण्याची भूमिका घेतली आहे. ती या सभासदांना चालणार नाही. अशी खात्री विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली आहे.
दिवसभर गावभेट दौरे करून सायंकाळी मुंढेवाडी येथे जाहीर सभेचे आयोजित करण्यात आले होते.
या बैठकीत विठ्ठलच्या निवडणुकीत दिलेला शब्द, आता आगामी चालू असलेली प्रगतीची दिशा, याबाबत सविस्तर माहिती सांगितली. सहकार शिरोमणीची अधोगती आणि सत्ता दिल्यास त्याठिकाणी करून दाखविणार असल्याची प्रगती याबाबत आकडेवारीत माहिती सांगितली.
आपण या जिल्ह्यात साखर कारखानदारीत आल्यापासून अनेक कारखानदारांचे नुकसान होत आहे. आपण या कारखाना मधील सर्वच माहिती सभासद, कामगार यांना सांगत आहे.
यामुळे काळेबेरे करण्यासाठी अडचणी वाढत आहेत. याचाच परिणाम म्हणून आपल्याला रोखण्याचा प्रयत्न विविध मार्गाने केला जात आहे.
परंतु यामध्ये हित असलेला महत्वाचा घटक सभासद आणि कामगार यांना आपली भूमिका पटली आहे. त्यामुळे विठ्ठल बरोबर सहकार शिरोमणी एकत्रित कारभार करत असताना उत्पादन खर्च कमी होऊन अधिकचा नफा त्यांनाच मिळणार आहे.
यामुळे सत्तांतर अटळ असल्याची खात्री आपल्याला पक्की असल्याचे मत अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी दिपक पवार यांनी सत्ताधारी काळे यांचेवर टीका केली. आपण केवळ सहकार शिरोमणी नाही, तर सीताराम कारखान्यामध्ये अडकून पडलेले पैसे मिळाले पाहिजेत.
यासाठी कायदेशीर लढा उभारला होता. त्या मतदारांनी या निवडणुकीत आपणाला कौल देण्यासाठी तयारी ठेवली असल्याचेही सांगितले. मागील निवडणूक लढवीत असताना याच मुंढेवाडी येथे आमची सभा उधळण्यात आली होती.
मात्र यावर्षी आमची ताकद वाढल्याचे आणि विजयाची खात्री पटल्याने आज आमच्या सर्वांचे जंगी स्वागत तर झालेच. याच गावातील अनेक नेते आणि सभासद यांनी पाठिंबा अन् प्रवेश केला आहे. यामुळे सत्तांतर अटळ आहे. असेही दिपक पवार यांनी सांगितले.
यावेळी रयत क्रांती संघटना तसेच प्रहार संघटना या सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी अभिजीत आबा पाटील यांच्या गटाला जाहीर पाठिंबा दिल्याचे पत्र देखील यावेळी देण्यात आले.
याबैठकीत यावेळी ज्येष्ठ नेते ज्ञानू बापू गायकवाड,बाळासोदादा पाटील डॉ बी.पी. रोंगेसर, सुदाम मोरे, निवास भोसले, संचालक अशोक नाना घाडगे, सतीश देशमुख, ह. भ. प. माऊली पवार महाराज, रणजित बागल, सचिन पाटील, यांनीही भाषण केले. या भागातील विठ्ठलचे आजी माजी संचालक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मोठ्या प्रमाणात झाले प्रवेश
मुंढेवाडी येथील बैठकीत अभिजीत पाटील यांच्या कर्तुत्वावर विश्वास ठेऊन अनेक नेते, आणि सभासद यांनी प्रवेश आणि पाठिंबा व्यक्त केला आहे. यामध्ये लक्ष्मण नलवडे, घनश्यम शिंगटे, नागनाथ मोरे, बाबुलाल मुलांनी ,शौकत मुजावर, बाबासाहेब पाटील, रवींद्र मोरे, महादेव राऊत,
महादेव मोरे, मुसांभाई मुजावर, जहांगीर मुजावर, पांडुरंग काळे, भागवत काळे, अनिल दांडगे, दत्ता मोरे, तुकाराम मोरे, उपरी ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास नागणे, जगन्नाथ नागणे, जगदीश नागणे, तानाजी नागणे, आदीसह प्रवेश सुरूच आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज