मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क।
‘सच्चाई के बंदे, सुशीलकुमार शिंदे या गौरवगीताच्या सादरीकरणासह काँग्रेसचा मेळावा आज रविवारी होणार आहे. हे गीत पुन्हा सादर केले जात आहे.
राज्यातील तीन माजी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, विधानसभेतील नेते अशा भरगच्च नेत्यांच्या उपस्थितीत होत असलेला हा कार्यक्रम म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात पुन्हा उतरण्याची सुशीलकुमार शिंदे यांच्या तयारीचीच चर्चा रंगली असल्याचे वृत्त दिव्य मराठीने प्रसिद्ध केले आहे.
एकीकडे महाविकास आघाडीचे बळ आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मिळालेला काँग्रेसचा विजय या बदलत्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन सोलापुरातून काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांनीच ही निवडणूक लढवावी, असा अग्रह धरला जात आहे.
काँग्रेसने स्थानिक नेते तसे साकडे घालत आहेत. यापूर्वीच्या दोन निवडणुकांत मोदी लाटेमुळे शिंदेना पराभव पत्करावा लागला आहे.
मात्र मोदी सरकारविरोधात नागरीकांत निर्माण होत असलेला रोष लक्षात घेऊन कॉंग्रेसने निवडणूकीची तयारी सुरू केली आहे.
एकीकडे दोनवेळा पराभव, प्रणितींच्या नावाचीही चर्चा
शिंदे यांनी आतापर्यंत सोलापूर लोकसभेच्या चार निवडणुका लढविल्या आहेत. पाचव्यांदा ते निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे.
गेल्या दोन निवडणुकांत पराभव झाल्याने यावेळी प्रणिती शिंदे या लोकसभेच्या उमेदवार असतील अशी शक्यता बोलून दाखविली जात आहे. मात्र महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस मागत आहे.
शिंदे असतील तर हा वाद फार ताणला जाणार नाही अशी अटकळ बांधली जात आहे. सोलापुरात शिंदे हाच काँग्रेसचा चेहरा असेल असे या निमित्ताने स्पष्ट होऊ लागले आहे.
महाविकास आघाडी भक्कमपणे एकत्र राहिली तरच काँग्रेसला हा मतदारसंघ पुन्हा मिळविणे शक्य होईल. आता निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा शिंदे यांनी अनेकवेळा केली. २००४ साली निवडणुकीतनंतरही त्यांनी अशीच घोषणा केली होती. त्यानंतरही अनेकवेळा अशा घोषणा केल्या आहेत.
गौरवगीत आणि कर्नाटक मुख्यमंत्री निवडीच्या निमित्ताने राजकारणात सक्रिय
हुतात्मा स्मृती मंदिरात होत असलेल्या मेळाव्यात शिंदे यांच्यावरील गायक मोहम्मद आयाज यांनी सादर तयार केलेल्या गौरवगीताचे सादरीकरण होणार आहे. त्यात शिंदे यांच्या कार्यावर प्रकाश टाकत ‘सच्चाई के बंदे, सुशीलकुमार शिंदे’ हे गीत सादर करण्यात आले आहे.
ते आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनाही ऐकवले जाईल, तर दुसरीकडे कर्नाटकाची जबाबदारी सोपवून काँग्रेसने शिंदेंना पुन्हा सक्रिय व्हायला भाग पाडले. ही संधी शिंदेनीही सोडली नाही, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही ते आता सक्रिय होत असल्याचे काँग्रेस नेते सांगत आहेत.
रविवारचा मेळावा निवडणूक तयारीचाच, तीन माजी मुख्यमंत्री एका व्यासपीठावर
हुतात्मा स्मृती मंदिरात रविवारी सकाळी ११ वाजता मेळावा होणार आहे. राज्यातील प्रमुख नेते माजी मुख्यमंत्री स्वतः सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह शहर जिल्ह्यातील सर्व नेते एका व्यासपीठावर येत आहेत. या निमित्ताने आगामी महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेसला सक्रीय करणारा हा मेळावा ठरेल.
आगामी लोकसभेसाठी सोलापुरात भाजपकडून पुन्हा नवीन चेहऱ्याचा शोध
भारतीय जनता पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्यांदा नवीन चेहऱ्याचा शोध सुरू झाला आहे. २०१४ ला शरद बनसोडे यांनी शिंदेंचा पराभव केला. नंतर २०१९ ला विद्यमान खासदार जयसिध्देश्वर महास्वामी यांनी पराभव केला.
पण स्वामी हे एकीकडे जात प्रमाणपत्र बनावट दिल्याच्या प्रकरणात अडकले आहेत. तर पुन्हा रिपीट न करण्याची पक्षाची भूमिका यामुळे आता नवीन चेहरा शोधला जात आहे. केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या रिपाइंचे राजा सरवदे यांनीही या जागेवर हक्क सांगितला आहे.(स्रोत:दिव्य मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज