मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा शहरातील प्रमुख रस्ते आणि विशेषतः ऐतिहासिक श्री संत दामाजी पंतांच्या पुतळ्याचा परिसर फेरीवाल्यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी नगराध्यक्षा सौ. सुनंदा आवताडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
बाजारदिवशी स्वतः रस्त्यावर उतरून त्यांनी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांना कडक शब्दांत तंबी दिली असून, नियम मोडल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.

पुतळा परिसर फेरीवाला मुक्त होणार!
श्री संत दामाजी पंतांचा पुतळा सध्या फळ आणि फूल विक्रेत्यांच्या गराड्यात अडकला आहे. या बाबीची गंभीर दखल घेत, नगराध्यक्षांनी पुतळ्याभोवती बसणाऱ्या सर्व विक्रेत्यांना जागा तातडीने रिकामी करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. यापुढे या परिसरात व्यवसाय करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका
दामाजी चौकात शाळा आणि बाजारपेठ असल्याने येथे विद्यार्थी आणि वाहनधारकांची मोठी वर्दळ असते. मात्र, विक्रेते थेट रस्त्यावर बसत असल्याने येथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
”व्यापार करा, पण नागरिकांना वेठीस धरू नका. आखून दिलेल्या जागेतच मालाची विक्री करा.

जर रस्त्यावर धोकादायक पद्धतीने व्यवसाय सुरू राहिला, तर पालिकेकडून जप्ती आणि दंडाची कारवाई केली जाईल,” अशा स्पष्ट सूचना नगराध्यक्षा सुनंदा अवताडे यांनी यावेळी दिल्या.
रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली असून, शहराचा चेहरामोहरा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी विक्रेत्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री संत दामाजी पंतांच्या पुतळ्याभोवती फळविक्रेते, फूल विक्रेते आदी बसतात. पुतळा या व्यवसायिकांच्या गराड्यात अडकला आहे. यावेळी पालिकेच्या करनिरीक्षक महानंदा धुमाळ, लिपीक बाबासो पवार, नागन्नाथ राजमाने व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













