मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
देशात विश्वासघातकी राजकारणाला शरद पवार यांनीच सुरुवात केली. स्व.वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांचे चांगले चाललेले सरकार पाडणाऱ्या शरद पवार यांना आज पाठीत खंजीर खुपसणे काय असते, हे चांगले कळाले असेल, असा टोला माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी शनिवारी लगावला.
चौकशांमधून सुटण्यासाठीच काकाच्या पाठीत पुतण्याने खंजीर खुपसला. आज खऱ्या अर्थाने स्व. वसंतदादा पाटील यांच्या आत्म्याला चिरशांती लाभली आहे. आजवर विश्वासघातकी राजकारण करणे हेच पवारांना नडले असून, राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळीला शरद पवार हेच जबाबदार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कट्टर पवारविरोधी म्हणून सर्व महाराष्ट्राला परिचित असलेल्या डॉ. पाटील यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना शरद पवार यांचा आदर्शच त्यांचा पुतण्या अजित पवार याने घेतला आहे.
आजवर ज्यांच्या पाठीत खंजीर खुपसले, त्यावेळी ५० वर्षांपूर्वी त्यांना जो काही त्रास झाला असेल, तो स्वतः ला कसा होतो, हे शरद पवार यांना पाहायला मिळाला आहे. नियतीचा नियम असून, जे पाप करायचे, ते येथेच फेडायचे, शरद पवार यांना या वयात पाप फेडावे लागले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज