टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर तालुक्यातील एकलासपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माता पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. यावेळी पालक व मुलांच्या मनातील प्रश्नांचे निरसन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सरपंच नंदकुमार अवताडे, उपसरपंच हनुमंत ताड हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे साहेब यांनी उपस्थिती देऊन मेळाव्यास व पालकांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी संचालक योगेश ताड, माजी सरपंच बाळासाहेब ताड, सनराइज पब्लिक स्कूलचे संस्थापक समाधान गाजरे, माजी उपसरपंच तानाजी ताड, मेजर बळीराम ताड,
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कालिदास ताड, शिक्षणप्रेमी भागवत यादव, पालक समाधान ताड, विशाल ताड, लक्ष्मण खताळ, अनिल ताड, पंजाब ताड, रायबान ताड, सिद्धेश्वर ताड, आदीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दयानंद चव्हाण गुरुजी यांनी मोहोळ तालुक्यातील पापरी गावाच्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या दि.3 ऑगस्टच्या लाईव्ह कार्यक्रमा विषयी माहिती दिली.
योगेश ताड यांनी शाळेच्या विकासासाठी शक्य होईल ते गावाकडून भरभरून योगदान देण्याचे आश्वासन दिले.
शिक्षणप्रेमी भागवत यादव कार्यक्रमप्रसंगी शिक्षणविषयक मत मांडताना त्यांचे नयनअश्रू ओसंडून वहात होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले गटशिक्षणअधिकारी यांनी पालकांना शैक्षणिक उठlवातून निधी गोळा करून शाळेचा विकास करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद चव्हाण गुरुजी यांनी, सूत्रसंचलन महादेव जाधव गुरुजी तर आभार प्रदर्शन महादेव सातपुते गुरुजी यांनी केले.
कार्यक्रमाला शाळेच्या मुली व त्यांच्या माता बहुसंख्य प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर गायकवाड गुरुजी, दयानंद चव्हाण गुरुजी, व्यवस्थापन समिती अध्यक्ष कालिदास ताड तसेच केंद्रातील नागनाथ क्षीरसागर गुरुजी ,सतीश पाटील गुरुजी, शाळेच्या शिक्षिका शुभांगी पारेकर मॅडम, अपर्णा जाधव मॅडम, रतन फुलारे मॅडम यांनी परिश्रम घेतले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज