टीम मंगळवेढा टाईम्स |
कलावंतांचे माहेरघर म्हणून लौकिक असलेल्या मरवडे फेस्टिव्हलचा रौप्यमहोत्सवी सोहळा आज १७ ते २२ मार्च या कालावधीत होत असून या निमित्ताने भरगच्च सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक सुरेश पवार यांनी दिली.
तुकाराम बीजेच्या मुहूर्तावर होणाऱ्या गाव यात्रेला जोडूनच सन २००० पासून मरवडे फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. कोरोना संकटकाळातील एका वर्षांचा खंड वगळता हा कार्यक्रम निरंतर राबविला जातो.
कलावंत व लोककलावंतांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून मरवडे फेस्टिव्हलकडे पाहिले जाते. म्हणूनच रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आज सोमवार दि. १७ मार्च रोजी सायं. ४ वाजता कलावंतांची शोभायात्रा काढण्यात येणार असून यामध्ये शेकडो कलावंत व पारंपरिक वाद्य कलाकार सहभागी होणार आहेत.
मंगळवार दि. १८ मार्च रोजी सायं. ७वा. छत्रपती परिवाराच्या पत्रकारांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात येणार असून त्यानंतर लगेचच विरेंद्र केंजळे प्रस्तुत साज सातारा” हा सुंदर कार्यक्रम होणार आहे.
बुधवार दि. १९ रोजी रात्री ८ वा. शिवशाहीर रंगराव पाटील व कला पथक ( कोल्हापूर) प्रस्तुत” मुद्रा भद्राय राजते” हे ऐतिहासिक पोवाडा नाट्य आयोजित करण्यात आला आहे.
गुरुवार दि. २० रोजी स. १० वाजता कला प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. यामध्ये काष्ठशिल्पकार राहुल लोंढे, अमित भोरकडे, राजू रायबान यांच्या सुंदर पेंटिंग्ज, फोटोग्राफीचा आनंद रसिकांना मिळणार आहे.
शिवाय युगंधर आखाड्याच्या वतीने ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, तसेच माहेश्वरी कलादालन, यशवंत गाजूल, राकेश गायकवाड यांच्या दुर्मिळ वस्तूंचे देखील प्रदर्शन अनुभवण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
याच दिवशी दु. १२ वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, रंगभरण, चित्रकला आयोजित करण्यात आलेल्या आहेत तर संध्या. ८ वा. जयदीप डाकरे (भूदरगड) प्रस्तुत” गर्जा महाराष्ट्र माझा” हा मराठी लोक परंपरेचे दर्शन घडविणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शुक्रवार दि.२१ मार्च रोजी दु.३ वाजता शैक्षणिक पुरस्कार सोहळ्यात शाळा व शिक्षकांचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव (परभणी) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तर संध्या. ७वाजता महाराष्ट्रातील नामवंत निमंत्रित नृत्य कलावंतांचा नृत्य जल्लोष साजरा होईल. अधिक माहितीसाठी क्र.७०५७४७५६१० स्पर्धा,९४२१०६७१०७ येथे संपर्क साधावा.
पुरस्कार सोहळ्याने होणार सांगता
या संपूर्ण सोहळ्याची सांगता शनिवार दि.२२ मार्च रोजी होणार असून सायं. ४ वाजता मंगळवेढा तालुक्याच्या विकासात मोलाची भर घालणाऱ्या विविध क्षेत्रातील २५ मान्यवरांचा ‘समाज गौरव पुरस्काराने’ विशेष सन्मान केला जाईल.
तर संध्या. ७.३० वा. मरवडे फेस्टिव्हलच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या साहित्य, कला क्षेत्रातील राज्य स्तरीय पुरस्कारांचे वितरण तसेच मरवडे भूषण, श्रावणबाळ तसेच आदर्श माता या पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात येणार आहे.
त्यानंतर लगेचच निमंत्रित कींच्या उपस्थितीत” काव्यसंध्या” हा कार्यक्रम होणार असून या संमेलनाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध कवयित्री डॉ. संजिवनी तडेगांवकर (जालना) या भूषविणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज