अक्षय फुगारे । देशाची एकता,अखंडता व स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या आजी माजी सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून सैनिकांना ग्रामपंचायत कर सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सरपंच सौ.कलावती पवार यांनी दिली.
केंद्र व राज्य शासनाने विविध शासन निर्णयाद्वारे देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची बाजी लावणार्या सैनिक व अर्धसैनिक दलाच्या आजी माजी जवानांना मालमत्ता कर व स्थानिक प्राधिकरणाने इतर सुविधांसाठी आकारण्यात येणाऱ्या करांतून सवलत देण्यासाठी आदेश काढले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात देखील अर्थमंत्री अजित पवार यांनी करमाफीची घोषणा केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील काही नगरपालिकांनी यापूर्वीच या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली आहे .या पार्श्वभूमीवर मरवडे गावातील सर्व आजी माजी सैनिक व अर्धसैनिक दलाच्या जवानांनी गेल्या वर्षभरापासून ग्रामपंचायतीकडे कर माफीसाठी निवेदन देऊन पाठपुरावा केला होता.
७४ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सन 2020/21 या आर्थिक वर्षापासून गावातील आजी माजी सैनिक ,अर्धसैनिक दलातील जवान तसेच शहीद जवानांच्या कुटुंबाना मालमत्ता कर व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून करमाफीचा हा प्रस्ताव जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे विहीत नमुन्यात सादर केला जाणार असून संबंधित विभागाच्या पूर्व परवाणगीने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल असे उपसरपंच सौ.सुनिता बनसोडे यांनी सांगितले.
नाविण्यपूर्ण योजना राबवून वेगाने विकासकामे करण्यासाठी लौकिक मिळविलेल्या जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त मरवडे ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे मरवडे गावासह सोलापूर जिल्ह्यातील आजी माजी सैनिक संघटनेने स्वागत केले आहे.
Marwade presents Independence Day gift to ex-servicemen, decides to give Gram Panchayat tax relief to soldiers
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज