मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
सामान्य ग्राहकाला कर्ज देताना बँका त्या ग्राहकाच्या परतफेडीच्या क्षमतेसोबतच त्याच्या ‘सिबील स्कोअर’चा सुद्धा विचार करतात. सिबील चांगला असेल तर कर्जावरील व्याजदर थोडा कमी केला जातो, आणि सिबील खराब असेल तर व्याजदराचा टक्का वाढू शकतो.
वेळप्रसंगी खराब सिबील स्कोअरचे कारण देत बँक संबंधित ग्राहकाला कर्ज नाकारू शकते. मात्र, या ‘सिबील’ मुळे एखादा विवाह मोडला जाण्याचा प्रकार विरळाच म्हणावा लागेल. मूर्तिजापूर शहरात ही घटना घडली आहे.
आर्थिक साक्षरतेचा धडा…
सिबीलच्या माध्यमातून मुलाचा संपूर्ण आर्थिक ताळेबंद पुढे आल्याने त्याच्या कुटुंबीयांना सुद्धा फार काही बोलता आले नाही. मात्र, बदलत्या काळात आर्थिक साक्षरतेबाबतचा नवा धडा या घटनेतून सर्वांना मिळाला.
मुलगा कर्जबाजारी असेल तर मुलगी का द्यावी?
मुलाचा सिबील स्कोअर अतिशय कमी असल्याचे दिसले. मुलाने आतापर्यंत कुठल्या कुठल्या बँकेतून आणि किती कर्ज घेतले आहे, याचा रीतसर तपशील सिबीलद्वारे सर्वापुढे आला.
नवरा मुलगा कर्जबाजारी असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे बैठकीतील खेळीमेळीचे वातावरण गंभीर झाले.
सर्व गोष्टी चांगल्या असल्या तरी मुलगा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल तर, आपली मुलगी त्याला का द्यावी, असा विचार मामाने मांडला.
पसंती ठरली, बैठक बसली, मामाने मागितले ‘सिबील’
मूर्तिजापूर शहरातील दोन कुटुंबांमध्ये मुला-मुलीच्या विवाहाची बोलणी सुरू झाली. एक-दोन बैठकी झाल्या. पसंती ठरली, विवाह कसा व कुठे करायचा, याबाबत चर्चा झाली. या सगळ्या गोष्टींवर शिक्कामोर्तब करण्यासाठी मुलाच्या घरी बैठक सुरू झाली.
या बैठकीला मुलीचे मामा सुद्धा उपस्थित होते. त्यांनी मुलाचा सिबील स्कोअर तपासण्याचा आग्रह धरला. सिबील स्कोअर तपासला गेला व सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज