mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

इच्छुकांनो तयारीला लागा! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘या’ महिन्यात होणार?; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 9, 2025
in राजकारण

टीम मंगळवेढा टाईम्स ।

गेल्या काही काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या कधी होणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाचा युक्तिवाद सुरू आहे.

ओबीसी आरक्षणावर लवकरच निर्णय होईल. त्यानुसार न्यायालय निवडणूक घेण्यास मान्यता देईल. फेब्रुवारीत निकाल आला, तर एप्रिल महिन्यात निवडणुका होऊ शकतील, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आता खूप दिवस महापालिका नगरसेवकांविना राहू नयेत. लवकरच या निवडणुका होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकर निकाल देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली जाणार आहे.

फेब्रुवारीत निकाल आला, तर एप्रिल महिन्यात निवडणुका होऊ शकतात. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर करताच महाराष्ट्र शासन मनुष्यबळ, व्यवस्था उपलब्ध करून देईल. त्यामुळे निवडणुकीसाठी सज्ज राहावे.

काहीही करून पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक जिंकायची आहे. त्यासाठी सदस्य नोंदणी वाढवावी. ४ लाख सदस्य शहरातून वाढावेत. प्रत्येक बूथवरून ५ टक्के सक्रिय सदस्य करावेत. सदस्य नोंदणीसाठी शहराचे दोन जिल्हे करावेत, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार आहे का? असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता ते म्हणाले की, महापालिकेची निवडणूक स्थानिक आहे. त्यामुळे स्थानिक कमिटीला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल.

महाराष्ट्र म्हणून महायुतीने सोबत लढले पाहिजे, असा निर्णय घेतला आहे. पक्ष आणि मंत्र्यांमध्ये समन्वय राहावा, खात्याचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवेत, यासाठी भाजपच्या मंत्र्यांकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, विशेष अधिवेशनापूर्वी महत्वाची घडामोड; किती टक्के आरक्षण मिळणार?

एकनाथ शिंदेंनी घेतली मंत्री-आमदारांची शाळा, शिवसेनेच्या बैठकीत नेमकं काय घडलं? शिंदे यांनी दिला आमदारांना ‘हा’ कडक इशारा

July 14, 2025
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रकृतीबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती; म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन जयंत पाटील पायउतार; नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून यांची लागणार वर्णी?

July 12, 2025
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या रतनचंद शहा सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम सुरू; १५ जागांसाठी ‘इतके’ अर्ज दाखल

July 2, 2025
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अर्थमंत्री असूनही का व्हायचं होतं कारखान्याचं चेअरमन? काय होती अजित पवारांची राजकीय खेळी? ‘या’ राजकीय खेळीमागचे कारण काय?

June 29, 2025
पॉवर गेम! ‘राष्ट्रवादी’ नक्की कुणाची? आज होणार स्पष्ट; दोन्ही गटाच्या बैठकांकडे…

शरद पवार गटाच्या सोलापूर जिल्ह्यातील आमदाराकडून पेपरात अजितदादांच्या ‘घड्याळा’ची जाहिरात; पेपर वाचताच पक्षात खळबळ माजली

June 23, 2025
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

बुलाती है मगर जाने का..! शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांना सत्तेचे वेध; पवारांच्या ‘त्या’ भूमिकेने मोठा पेच

June 15, 2025
पॉवर गेम! ‘राष्ट्रवादी’ नक्की कुणाची? आज होणार स्पष्ट; दोन्ही गटाच्या बैठकांकडे…

मनोमिलन! ‘या’ दिवशी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ; शरद पवार-अजितदादा एकत्र येणार?

June 9, 2025
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

राजकीय खळबळ! दोन्ही पवार कधी एकत्र येणार? थेट प्रश्न, शरद पवारांच्या उत्तरानं सर्वच बुचकळ्यात

June 2, 2025
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजितदादा जे बोलतात ते करतात, लाडकी बहिण योजनेबाबत ‘या’ खासदारांचे यांचं मोठं वक्तव्य; दोन पवार एकत्र येण्याच्या चर्चांवर…

May 26, 2025
Next Post
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

पुन्हा आंदोलन! रोज एक गाव आंतरवालीतही उपोषण करणार; मराठा आरक्षणासाठी 'या' तारखेपासून गावागावांत साखळी उपोषण

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, विशेष अधिवेशनापूर्वी महत्वाची घडामोड; किती टक्के आरक्षण मिळणार?

एकनाथ शिंदेंनी घेतली मंत्री-आमदारांची शाळा, शिवसेनेच्या बैठकीत नेमकं काय घडलं? शिंदे यांनी दिला आमदारांना ‘हा’ कडक इशारा

July 14, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर ताण, लाडकी बहीण योजना बंद होणार? मिसेस मुख्यमंत्री म्हणाल्या…

July 14, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खबरदार! ‘या’ तारखेला आंतरवाली सोडली तर मागे सरकणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस सरकारला इशारा

July 14, 2025
दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

July 13, 2025
महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य राखीव पोलिस दलात आता महिलांना संधी मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन नियमित पदे निर्माण करण्यास दिली मान्यता

July 14, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी खळबळ! मंदिर समितीच्या दर्शन मंडपाचा ठेका मिळवून देतो म्हणून विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकावर लाचेचा गंभीर आरोप; फसवणूक झालेल्या व्यावसायिकांने पोलिसात दिली तक्रार

July 13, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा