टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्य मागासवर्ग आयोग व राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे मंगळवेढा तालुक्यातील शहरासह सर्व गावात मराठा सर्व्हेक्षण बाबत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका नोडल अधिकारी तथा तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.
राज्यातील मराठा समाजातील सर्व कुटुंबाचे प्रत्यक्ष सर्व्हेक्षण करून समाजाची अचूक माहिती मिळावी या दृष्टिकोनातून राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून आज दिनांक 23 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान राज्यातील प्रत्येक गावात मराठा सर्व्हेक्षण बाबत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 20 जानेवारी रोजी जिल्हा स्तरावर व आज दिनांक 21 जानेवारी रोजी तालुका स्तरावर प्रगणक व पर्यवेक्षक यांच्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
मंगळवेढा तालुक्यातील मराठा सर्व्हेक्षण साठी एकूण 447 प्रगणक व 34 पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली असून त्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, शिक्षक यांचा समावेश आहे.
सदरचे संपूर्ण सर्व्हेक्षण हे मोबाईल अँप च्या माध्यमातून केले जाणार असून त्यामुळे मिळणारी माहिती तात्काळ राज्य मागासवर्ग आयोगाला समजण्यास मदत होणार आहे.
तालुक्यातील सर्व प्रगणक यांना गाव व वॉर्ड नेमून देण्यात आले असून त्या वॉर्डातील सर्व घरांमध्ये जाऊन सर्व्हेक्षण करावे लागणार आहे. सर्व प्रगणक यांना आयोगाच्या वतीने ओळखपत्र देण्यात आले आहे.
सर्व्हेक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रगणक यांना संबंधित घरावर मार्कर पेनने गोल काढून त्यामध्ये MSBCC हा शब्द लिहावा लागणार आहे.
यामध्ये नागरिकांना पुरावा म्हणून कोणतेही कागदपत्रे देण्याची आवश्यकता नसून फक्त अँप मधील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.
अँप मध्ये मूलभूत माहिती, आर्थिक माहिती, कौटुंबिक माहिती, सामाजिक माहिती, आरोग्य विषयक माहिती अशा एकूण पाच भागात प्रश्नावलीची विभागणी करण्यात आली असून 180 पेक्षा जास्त प्रश्न असणार आहेत.
हे प्रश्न फक्त मराठा किंवा खुल्या प्रवर्गातील कुटूंबासाठी असून सर्व्हेक्षण करताना यापूर्वीच आरक्षणाचा लाभ मिळत असलेल्या कुटुंब आढळल्यास त्यांचा सर्व्हे पहिल्या दोन प्रश्नातच पूर्ण होणार आहे. रोज होणाऱ्या सर्व्हेक्षणाची माहिती तहसील स्तरावर सुद्धा पहावयास मिळणार आहे.
तालुका स्तरावर तहसीलदार यांना नोडल अधिकारी तर मुख्याधिकारी यांना सहायक नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.
तहसील स्तरावर निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यात पाच कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मराठा सर्व्हेक्षण मोहिमेच्या अनुषंगाने आज दिनांक 23 ते 31 जानेवारी दरम्यान राज्य मागासवर्ग आयोगाने नेमलेले प्रगणक तालुक्यातील सर्व कुटुंबांना भेट देणार असून त्यांना सहकार्य करण्याचे व प्रश्नावली मधील इत्यंभूत माहिती देण्याचे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज