टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा माजी आमदार पाशाभाई पटेल यांना राज्य सरकारने नुकताच कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे.
मंत्री पदाचा दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच मंगळवेढा येथे आले होते, त्यावेळी त्यांचा सामी फॅमिली क्लब अँड रिसॉर्ट येथे मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, उद्योजक संजय कट्टे, मोर्फाचे संचालक हरिभाऊ यादव यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.
पाशाभाई पटेल यांची राज्य कृषी मूल्य आयोगावर दुसऱ्या वेळी निवड झालेली आहे. दरम्यानच्या महाविकास आघाडीच्या काळात सदर पद रिक्तच होते. पाशाभाई पटेल यांनी यापूर्वी शेतकऱ्यांसाठी विविध आंदोलने उभी केली,
व सरकारला शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यास भाग पाडले. आता ते बांबू शेतीच्या दृष्टीने फार मोठा पुढाकार घेऊन काम करत आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकार त्यांच्या कामाची दखल घेऊन बांबू मिशन राज्यात राबवत आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्री ना.पियुष गोयल हॆ वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने परदेशात भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनासाठी इको फ्रेंडली बांबू स्टॉल उभा करून त्यांच्या सूचनांना पाठबळ देत आहेत.
बांबूच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार वाणिज्य मंत्रालयाच्या माध्यमातून एक हजार कोटीची योजना आखत आहे. याचे श्रेय पाशाभाई पटेल यांना जाणार आहे. सत्कारा नंतर पाशाभाई पटेल यांनी भारत दत्तू यांच्या शिवप्रसाद हॉटेलवरती ज्वारीची भाकरी व हरभऱ्याची भाजी या जेवणाचा आस्वाद घेतला.
यावेळी मराठवाडा नेता दैनिकाचे संपादक रामेश्वर बद्दार, मेजर तानाजी माने, सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते तानाजी लेंडवे आदी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज