mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरणार; ‘या’ तारखेला सोलापूर जिल्हा बंदची हाक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरणार; ‘या’ तारखेला सोलापूर जिल्हा बंदची हाक


 

टीम मंगळवेढा टाईम्स । मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची भूमिका मराठा समाजाने घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून येत्या सोमवार दि.21 सप्टेंबरला सोलापूर शहर व जिल्हा बंद ठेवून जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर आसूड आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


यासंदर्भात सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी प्रशालेच्या क्रीडांगणावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत समाजबांधवांनी आरक्षणप्रकरणी तीव्र भावना व्यक्त करीत केंद्र व राज्य सरकारचा कठोर शब्दांत निषेध केला. तसेच आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला मिळालेच पाहिजे. आता नाही तर कधीच नाही,एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.


प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा समन्वयक माउली पवार यांनी आपल्या स्वागतपर प्रास्ताविकात सरकारवर घणाघाती आरोप करीत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. 

अन्यथा हा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नसल्याचे सांगून येत्या दि.21 सप्टेंबर रोजी सोलापूर शहर व जिल्हा बंदची हाक देऊन मराठा समाज शहर व जिल्ह्यातील प्रत्येक आमदारांच्या घरासमोर आसूड ओढो आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.

यावेळी मोहोळचे बापू डोके, सांगोल्याचे केदार, दक्षिण सोलापूरचे विनोद पाटील, माढ्याचे प्रा.जी.के. देशमुख,बार्शीचे मंगेश दहीहंडे,सोलापूरचे नितीन चव्हाण, किसन दाडगे, राजन जाधव, निर्मला शेळवणे, उज्ज्वला साळुके, शुभांगी लंबे, प्रियंका डोंगरे आदींनी मनोगत व्यक्त करून मराठा आरक्षणाची मागणी केली.तसेच मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास त्याची किंमत सरकारला चुकवावी लागेल,असा इशाराही यावेळी देण्यात आला.


या बैठकीस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे,राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे, पद्माकर काळे, प्रवीण डोंगरे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, नगरसेवक विनोद भोसले, अमोल शिंदे,अक्कलकोटचे अमोलराजे भोसले, बाबाराजे निंबाळकर,संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे यांच्यासह लहू गायकवाड,ज्ञानेश्वर सपाटे,मनीषा नलावडे , लता ढेरे,दत्ता भोसले, सचिन गायकवाड आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीचे सूत्रसंचालन प्रा.गणेश देशमुख यांनी केले. आभार दत्ता मुळे यांनी मानले.

तर भावी पिढी माफ करणार नाही

मराठा समाजाला मिळालेले आरक्षण स्थगित केल्याने समाजावर खूप मोठा अन्याय झाला आहे. आता आरक्षण स्थगित केले, उद्या ते रद्दही करू शकतात.त्यामुळे मराठा समाजाला गप्प बसून चालणार नाही.आता नाही तर कधीच नाही ही भूमिका ठेवून रस्त्यावर उतरावे लागणार आहे.

अन्यथा भावी पिढी आपल्याला कधीच माफ करू शकणार नसल्याचे सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक माउली पवार यांनी सांगितले.


२१ सप्टेंबरलाच बंद का ?

दि.२१ सप्टेंबर रोजी सोलापूरच्या मराठा क्रांती मोर्चाला चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच दिवशी पुन्हा नव्या क्रांतीला सुरुवात करण्याचा निर्धार समाजबांधवांनी व्यक्त केल्याचे यावेळी सांगण्यात आले.या दिवशी ग्रामीण भागातील लोकांनी आपल्या भागातून जाणारा राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग अडवावा,शहरातील सर्व रस्ते बंद करण्यात येतील.

आरक्षण रद्द होण्याला कोण जबाबदार 

हे कोणी घडवून आणलय हे काळाच्या ओघात उघड होईलच. मराठा समाजाचे कार्यकर्ते या लोकांना उघडे पाडतील. मागील सरकारले महाधिवयाता आशुतोष कुभकोणी यांना कोटात जाऊ नये म्हणून सांगितले होते. यातून जे स्पष्ट व्हायचे आहे ते स्पष्ट होत आहे.पण आम्ही कोणाचे नाव घेणार नाही. या आदालनात सर्वपक्षीय नेते खांद्याला खांदा लावून लढतील, असे पदाधिकान्यांनी बोलून दाखवले.

Maratha community to take to the streets again; call for Solapur closed on September 21

Website : www.mangalwedhatimes.in

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या उपाध्यक्षपदी सौ.मिनाक्षी राखाडे यांची नियुक्ती

महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या उपाध्यक्षपदी सौ.मिनाक्षी राखाडे यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 5, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा