टीम मंगळवेढा टाईम्स ।
मराठा समाजाला मिळाले. आता अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकारकडून फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मराठा समाजास आरक्षण मिळाले आता पुढे काय?
याबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलवली आहे. या बैठकीत पुढील दिशा स्पष्ट करुन निर्णय घेण्यात येणार आहे.
सगेसोयरे शब्दांत मराठ्यांचे हित
मराठा समाजातील कुणबी नोंदीसंदर्भातील कायदा आयुष्यभरासाठी झाला आहे. आता या नोंदी मिळाल्या त्यांना आरक्षण मिळणार आहे. सगे सोयरे या शब्दात मराठ्याचा किती हित आहे. हे मी आधीच हेरल होते.
यामुळे अंतरवालीतून सुरू झालेली ही लढाई मुंबईपर्यंत एवढी लांब जाईल, असे वाटले नव्हते. मी मराठा समाजास म्हणालो, मुंबईत गल्ली गल्लीत जमा व्हा. त्यानंतर खरंच मुंबईतील गल्ली गल्लीत मराठेच दिसू लागले.
अंतरवाली सराटीपासून सुरु झालेली यात्रा अहमदनगरला पोहचली. त्यानंतर पुढे रोडच दिसत नव्हता. पुणे शहरात तर ६४ किलोमीटर लाईन होती. आपण लढा जिंकला, ५७ लक्ष लोकांना आरक्षण मिळाले आहे. त्यानुसार आडीच कोटी लोकांना होणार आहे.
मराठवाड्यात कमी नोंदी
मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या आहेत. त्यासाठी मराठा समाजाला आता सक्रीय भूमिका घ्यावी लागणार आहे. या अध्यादेशाला न्यायालयात आव्हान देता येणार नाही. मी सर्व अभ्यासक, तज्ज्ञ, वकील यांच्याशी चर्चा केली आहे. आता या कायद्यातून मराठ्यांच्या पोरांचं भविष्य कुणीही थांबू शकत नाही.
मराठवाड्यातील मराठ्याच्या अडीअडचणी देखील संपणारा आहेत. मराठ्यांचा सात बारा पक्का झाला, आता वळवळ करायची गरज नाही. या पाच महिन्याच्या संघर्षाने समाजाला खूप काही दिले. आता सग्या सोयऱ्या शब्दाने सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज