मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मराठा समाजातील मुला-मुलींचे विवाह करताना प्री-वेडिंग शूटिंग करू नये, असा ठराव मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित मराठा वधू-वर मेळाव्यात करण्यात आला.
या ठरावाला सर्व समाजबांधवांनी एकमताने मान्यता दिली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी आणि शासनाला जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून दिले आहे.
समाजबांधवांनी या ठरावाची पायमल्ली न करता प्री-वेडिंग शूटिंगला पायबंद घालावा, असा सूर यावळी निघाला.
मराठा सेवा संघ प्रणित मराठा वधू-वर कक्षाच्या वतीने रविवारी शिवस्मारक सभागृहात वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते.
यावेळी व्यासपीठावर नांदेडचे पोलिस उपअधीक्षक बाळकृष्ण हनकुडे-पाटील, जय हिंद शुगरचे चेअरमन बब्रुवाहन माने-देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मेळाव्याला परिसरातील तब्बल ४०० ते ५०० वधू-वर, त्यांचे पालक हजर होते. यावेळी प्राथमिक स्वरूपात काही वधू तर काही वरांनी आपला परिचय करून दिला. परिस्थिती नसताना देखील कर्ज काढून प्री-वेडिंग शूटिंगवर लाखो रुपये खर्च केले जातात.
वैयक्तिक खासगी फोटो सार्वजनिक करण्याची प्रथा रूढ झाली आहे. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. प्री-वेडिंग शूटिंगवर येणारा खर्च गोरगरिबांच्या विवाह सोहळ्यासाठी आर्थिक मदत म्हणून देण्याचा सूर देखील या मेळाव्यात उपस्थितांनी आळवला.
भविष्यात ‘एक गाव एक विवाह’ ही संकल्पना मराठा सेवा संघाच्या माध्यमातून पुढे आणली जाणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज