मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
कृषी संपन्न देश हा सर्वात सुखी देश असे समजण्यात येते पुरातन काळापासून आपल्या भारताची गणना ही कृषी संपन्न देशात करण्यात येत आहे.विविध नैसर्गिक संपत्तीने नटलेल्या या देशात शेतकरी हा आज देखील राजा समजला जातो.
परंतु आता शेती कमी होऊ लागल्याने आहे ती शेती टिकून त्या शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल यावर भर देण्याची वेळ आली आहे.
शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्याच्या प्रयत्नातून निर्माण झालेल्या मारापुर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी गेली अनेक वर्ष शेतकरी सुखी तर देश सुखी हे बोधवाक्य प्रमाणे मानून आपली वाटचाल चालू ठेवली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नियंत्रणाखाली गावांमधील शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणारी विविध कार्यकारी सेवा सोसायटी सक्षम करण्याचे नियोजन केले आहे.
याबाबत मारापुरचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव म्हणाले सोसायटीला उत्पन्नाचा नवीन मार्ग उपलब्ध करून देण्याची योजना आहे कारण ग्रामीण भागामध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या मार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जात असल्याने ही सोसायटी शेतकऱ्यांचा मुख्य आधार असते.
या सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येते.पीक कर्ज बरोबर खते बियाणे,शेती अवजारे यासाठी ही सोसायटी कर्ज पुरवठा करतात त्यांना व्यवसायाभिमुख करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची योजना आहे.
यावेळी सर्व सदस्याचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी माजी सरपंच भगवान आसबे, उपसरपंच अशोक आसबे, विक्रम यादव,अभिमान जानकर, परमेश्वर यादव,राजकुमार यादव,तुळशीराम आसबे,नाथा माने,संतोष गांडुळे, पिंटू मांडवे,नवनाथ आसबे,तुकाराम यादव, बालाजी यादव आदींचे योगदान लाभले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज