टीम मंगळवेढा टाईम्स । समाधान फुगारे
धनश्री परिवार व प्रा.शिवाजी काळुंगे सर यांच्या माध्यमातून अनेक गोरगरीब कुटुंबीय स्वतःच्या पायावर उभे राहिली आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या आरोग्याची जबाबदारी शासन घेणार असून यासंबंधी कायदा लवकरच अस्तित्वात येणार असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.
धनश्री महिला पतसंस्था रौप्यमहोत्सव व धनश्री मल्टिस्टेट तपपूर्ती सोहळ्याच्या उद्घाटन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
खासदार धनंजय महाडिक, शिवसेनेचे नेते प्रा.शिवाजीराव सावंत, भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल सावंत, अँड.सुजित कदम, उद्योजक पवन महाडिक, दामाजीचे चेअरमन शिवानंद पाटील, जकराया शुगरचे अँड.बिराप्पा जाधव, प्रणव परिचारक, व्हा.चेअरमन तानाजी खरात, रामचंद्र जाधव, तानाजी काकडे, स्वप्नील निकम आदीजन उपस्थित होते.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत पुढे बोलताना म्हणाले की, प्रा.शिवाजी काळुंगे सर यांच्या माध्यमातून आम्ही वाढलो आहे. सरांनी एक व्हिजन ठेऊन काम केले त्यामुळे आज त्यांना मोठं यश मिळाले आहे.
आयुष्यातील 75 वर्ष प्रा.शिवाजी काळुंगे व शोभा काळुंगे यांनी खडतर प्रवास करून गोरगरीब कुटुंब व सर्वसामान्य लोकांच्या मनात आहेत. धनश्री परीवाराच्या माध्यमातून गोरगरीब लोकांसाठी ते झटत आहेत.
प्रा.शिवाजी काळुंगे व शोभा काळुंगे यांच्या सोहळ्यासाठी राज्य शासन व केंद्र शासनाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने त्यांचा सन्मान झाला.
आपली वृत्ती चांगली असेल तर मदत केलेली माणूस विसरत नाही. पोटात आग होती म्हणून डोक्यात ताकत आली आणि सोलापूर जिल्ह्याचा विकास झाला.
गेल्या अनेक वर्षापासून मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे तो लवकर मार्गी लागणार असल्याचे आरोग्यमंत्री यांनी सांगितले.
तसेच म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यासाठी आणून दिले आहे आम्ही कागदावर बोलत नाही आम्ही वास्तव्यावर काम करतो असेही ते म्हणाले.
घराघरात विकास होण्यासाठी स्टार्टअप व्यवसाय सुरू करणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांसाठी आमच्या शासनाने अनेक योजना सुरू केल्या असून आता आरोग्याची संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी शासन घेणार कायदा लवकरच येणार असल्याचा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनश्रीचे संचालक मारुती सावंत यांनी केले तर आभार राजलक्ष्मी गायकवाड यांनी मानले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज