मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्थापनकरण्यातआलेल्या मराठा आरक्षण उपसमितीमधून आतापर्यंत खूप काही गोष्टी मराठा समाजाला मिळाल्या आहेत. मराठाआंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीतून खूप गोष्टी साध्य झालेल्या आहेत.
अशातच मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आंदोलनाची हाक दिली आहे. तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला सनदशीर पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे.
मात्र असं न करता मुंबईला जाणार, उपोषण करणार असे मनोज जरांगे म्हणत असतील आणि सनदशीर मार्ग सोडून जर ते आंदोलन करत असतील तर सरकार कारवाई करायला बसलेच आहे.
असे इशारा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलाआहे. तसेच मनोज जरांगे यांनी कागद, पेन घेऊन आरक्षण बाबत सरकार समोर चर्चेला बसायला हवं, अस आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
एकाच माणसाने किती वेळ काम करायचं? – चंद्रकांत पाटील
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून हालचाली सुरू झाल्यात. राज्य सरकारने मराठा समाजाच्या उपसमितीचं पुनर्गठन केलंय.
मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली. याआधी चंद्रकांत पाटील उपसमितीचे अध्यक्ष होते. जातप्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय प्रक्रिय सुरळीत राबवणे, मराठा आंदोलक आणि शिष्टमंडळाशी चर्चा करणे आदी गोष्टी मंत्रिमंडळ उपसमितीच्या कार्यकक्षेत असणार आहेत.
दरम्यान या विषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले कि, मराठा आरक्षण बाबत नेमलेल्या उपसमितीवर मी बराच काळ अध्यक्ष होतो, एकाच माणसाने किती वेळ काम करायचं. मात्र समितीत मी आहे. माझ्या कार्यकाळात कित्येक नवीन लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालंय असेही ते म्हणाले.
मराठा समाजाच्या उन्नतीसाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करू- उदय सामंत
एकंदरीत बघता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठा आरक्षण हे कशा पद्धतीने दिले गेले आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारच्या समोर आहेत. परंतु एक भूमिका स्पष्ट असली पाहिजे की मराठा आणि ओबीसी समाज दोन्ही घटक महाराष्ट्रातले प्रमुख घटक आहेत. त्यामुळे ओबीसी समाजावर कुठेही अन्याय होणार नाही, हे देखील लक्षात घेतले पाहिजे.
त्यामुळे जरांगेंच्या मागण्या असतील किंवा मराठा समाजाच्या उन्नतीच्या मागण्या असतील तर त्या चांगल्या पद्धतीने सरकारला कशा पुढे नेता येतील ते बघावे लागेल. आंदोलन करणं न करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामध्ये मला काही पडायचं नाही. मात्र, मराठा समाजाच्या उन्नतीसाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करू अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज