टीम मंगळवेढा टाइम्स ।
प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागे त्यांनी जीवनात बाळगलेले ध्येय, ध्येयाच्या दिशेने केलेली वाटचाल, जिद्द व त्याने केलेले अपार कष्ट, आलेल्या परिस्थितीशी केलेला सामना मोलाचे असतात.
एखाद्याने मिळवलेली पदवी, यश हे त्याच्यापुरते मर्यादित न राहता त्याने मिळवलेल्या यशामुळे अनेकांच्या जीवनात आनंद येत असतो यावरच त्या व्यक्तीची यशस्विता अवलंबून असते.
अशाच सामान्य कुटुंबातून आलेल्या नितीन इंगोले यांनी परिस्थितीशी झगडत मोठ्या कष्टाने, जिद्दीने स्वतः तर यशस्वी झाले.
परंतु माणगंगा उद्योग समूहाच्या माध्यमातून विविध उद्योगांची उभारणी करून अनेकांच्या जीवनात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. माणगंगा उद्योग समूहाने आज घेतलेली गरुड भरारी लक्षवेधी ठरत आहे.
सांगोला शहरातीलच खारवटवाडी येथील नितीन इंगोले यांची घरची परिस्थिती अगदी बेताचीच. वडील शेतकरी तर आई गृहिणी. त्यामुळे लहानपणापासूनच प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला. रयत शिक्षण संस्थेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण झाले.
सांगोल्यात 11 वी 12 वी झाल्यानंतर कोल्हापूर येथे बी.एस.सी ऍग्री पूर्ण केले. त्यानंतर पुणे शहरांमध्ये एम.एस.सी ऍग्रीचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्यांनी कर्नाटका बँकेमध्ये नोकरी स्वीकारली.
त्यांनी बँकिंग क्षेत्रातील सी.ए.आय.आय.बी.चे शिक्षणही पूर्ण केले. आज कर्नाटका बँकेमध्ये सीनियर मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत. परंतु फक्त नोकरी करून स्वतःच्या कुटुंबाचा विचार करणे त्यांना योग्य वाटत नव्हते लहानपणापासून काहीतरी वेगळी करण्याची जिद्द त्यांच्या मनामध्ये असल्याने त्यांनी नोकरी करीतच 13 मे 2014 या वर्षी ‘माणगंगा उद्योग समूहा’ची जिद्दीने उभारणी केली.
माणगंगा उद्योग समुहाची उभारणी –
आपण शिक्षण घेऊन फक्त नोकरी करणे योग्य नसून काहीतरी वेगळे पण सामाजिक काम केले पाहिजे असे नितीन इंगोले यांना नेहमी वाटत होते. त्यामुळे नोकरीस असताना सुद्धा ही 2014 साली मोठ्या धाडसाने त्यांनी माणगंगा उद्योग समूहाची उभारणी केली.
आपल्याबरोबरच इतरांनाही आर्थिक स्थैर्य मिळावे, तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी त्यांनी प्रथमत: विठ्ठल गोल्डन डेअरी इंडस्ट्रीजची स्थापना केली. या डेअरीमार्फत त्यांनी दूध व्यवसायास प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी माणगंगा डेअरी इंडस्ट्रीज, माणगंगा ट्रान्सपोर्ट,
माणगंगा परिवार क्रेडिट सोसायटी, सांगोला, माणगंगा स्टार्च प्रायव्हेट लिमिटेड, माणगंगा बल्क मिल्क कूलर अशा विविध उद्योगांची माणगंगा उद्योग समूहमार्फत सुरुवात केली.
आज याच उद्योग समूहामार्फत अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. स्वतः बँकेत नोकरी करीत असताना सुद्धा सांगोल्यासारख्या शहरात विविध उद्योगांची उभारणी केली.
माणगंगा उद्योग समूह आज सांगोला शहराबरोबरच पंढरपूर, मंगळवेढा, जत तालुक्यांबरोबरच भोगावती (कोल्हापूर) परिसरात या विविध उद्योगांच्या शाखा त्यांनी सुरू केल्या आहेत.
माणगंगा परिवार क्रिकेट सोसायटीचे महिन्याचे आर्थिक उलाढाल सहा ते सात कोटी पर्यंत गेली आहे. फक्त हे सांगोलेपर्यंत मर्यादित न राहता 14 नोव्हेंबर 2022 रोजी मंगळवेढा येथे या शाखेचा प्रारंभ होणार आहे.
त्याचबरोबर पंढरपूर, आटपाडी, मोहोळ,अकलूज, घेरडी, सांगली येथेही या सोसायटीचा विस्तार होणार आहे. तर माणगंगा डेअरी उद्योगामार्फत 50 हजार क्षमतेपासून एक लाख लिटर प्रतिदिवस कलेक्शनकडे त्यांची वाटचाल सुरू आहे.
या डेरीमार्फत ताक, दही, लोणी, श्रीखंड, पेढा, आम्रखंड अशा सर्वच उत्पादने केली जात आहेत. या डेअरीचाही विस्तार शेजारील तालुक्यात करण्याचा मानस नितीन इंगोले यांनी बोलून दाखवला आहे.
उद्योग समुहाचे सामाजिक कार्य –
माणगंगा उद्योग समूहमार्फत विविध उद्योगांची उभारणी केल्यानंतर फक्त या व्यवसायाकडून आर्थिक स्थैर्य प्राप्त करावे असे नितीन इंगोले यांना वाटत नव्हते.
तर आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे काहीतरी देणे लागत असतो यासाठी त्यांनी आपल्या या उद्योग समूहावरमार्फत विविध सामाजिक कामे करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या उद्योग समूहातर्फे वित्तीय साक्षरता अभियान त्यांनी सुरू केले असून विविध ठिकाणी या साक्षरता अभियानाचे कार्यक्रम घेतले जातात.
त्याचबरोबर समाजातील सामाजिक प्रश्नांसाठी, त्यांचे निरकरण करण्यासाठी प्रबोधनात्मक व्याख्यानांचेही आयोजन केले जाते. ते स्वतः शेतकरी कुटुंबातून पुढे आल्याने शेतकऱ्यांच्या मुलाने उद्योग व्यवसायात पुढे यावे, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे यासाठी आपल्या उद्योगसमूहामार्फत शेतकरी मेळावे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे विविध उपक्रम ते प्रत्येक वर्षी आपल्या उद्योगसमूहामार्फत विविध ठिकाणी घेत असतात.
माणगंगा उद्योग समूहातील उद्योग –
– विठ्ठल गोल्डन डेअरी इंडस्ट्रीज
– माणगंगा डेअरी इंडस्ट्रीज
– माणगंगा ट्रान्सपोर्ट
– माणगंगा परिवार क्रेडिट सोसायटी, शाखा – सांगोला
– माणगंगा स्टार्च प्रायव्हेट लिमिटेड
– माणगंगा बल्क मिल्क कुलर हंगिरगे (ता. सांगोला)
– माणगंगा बल्क मिल्क कुलर, भाळवणी (ता. मंगळवेढा)
– माणगंगा बल्क मिल्क कूलर, भोगावती (कोल्हापूर).
प्रत्येकाने आपले ध्येय गाठण्यासाठी जिद्द कष्टाची तयारी ठेवली पाहिजे. परिस्थिती कोणतीही असो त्या परिस्थितीवर मात करून आपले ध्येय गाठावे. आपले उद्योग, व्यवसाय, नोकरी सांभाळत असतानाही प्रत्येकाने सामाजिक जाणीव मनामध्ये ठेवून सामाजिक कामे करण्यास भर दिला पाहिजे – नितीन इंगोले (अध्यक्ष, माणगंगा उद्योग समूह)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज