mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

 



सातारा । टीम मंगळवेढा टाईम्स । सातारा शहरातील एका डॉक्टरला हनिट्रॅपच्या जाळ्यात ओढणाऱ्या दोन संशयित महिलांना तपासासाठी पुण्याला घेऊन पोलीस रवाना झाले आहेत. या महिलांनी कोथरूड परिसरामध्येही अनेकांना अशा प्रकारे गंडा घालून लाखो रुपये उकळल्याचे तपासात समोर येत आहे. फोन करून त्या बड्या व्यक्तींना जाळ्यात ओढायच्या.


प्राची उर्फ श्रद्धा अनिल गायकवाड व पूनम संजय पाटील (दोघीही रा. सोमवार पेठ, सातारा, मूळ रा. कोथरूड, पुणे मूळ गाव : मंगळवेढा तालुक्यातील आसबेवाडी) या दोघींनी साताऱ्यातील एका प्रसिद्ध डॉक्टरला जाळ्यात ओढून त्यांच्याकडून तब्बल १२ लाखांची खंडणी उकळल्याचे समोर आले.

रविवारी दिवसभर पोलिसांनी त्यांच्या घरामध्ये झडती घेतली. त्या वेळी काही कागदपत्रे पोलिसांना आढळून आली आहेत. या दोघींच्या चौकशीमध्ये त्यांनी पुण्यामध्येही असे प्रकार केल्याचे पोलिसांना समजल्यानंतर रविवारी सायंकाळी या दोघींना घेऊन पोलीस पुण्याला रवाना झाले.

या दोघींचे कारनामे रविवारी प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर शाहूपुरी पोलिसांना अनेकांचे फोन आले. या महिलांनी कशा प्रकारे लोकांना गंडा घातला आहे, याची माहिती दिली जात होती. 

मात्र ‘आमचे नाव गोपनीय ठेवा,’ अशी विनंतीही संबंधित लोकांनी पोलिसांकडे केली आहे. अनेकांकडून त्यांनी दहा ते पंधरा लाख रुपये उकळल्याचे बोलले जात आहे.

अनेक बड्या व्यक्तींचे नंबर

या महिलांच्या मोबाइलमध्ये अनेक बड्या हस्तींचे नंबर सेव्ह असून त्यामध्ये सातारा आणि पुण्यातील उद्योजक, महाविद्यालयीन युवक, डॉक्टर अशा लोकांचा समावेश आहे. या नंबरच्या आधारे पोलीस आता संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचणार असून, ज्यांना या महिलांनी हनिट्रॅपच्या जाळ्यात ओढले त्यांना पोलीस स्वत:हून तक्रार देण्यास प्रवृत्त करणार आहेत.


नणंद-भावजय नव्हे, त्या तर मैत्रिणी श्रद्धा गायकवाड आणि पूनम पाटील या दोघी नणंद-भावजय आणि जोगतीन असल्याचे सांगत होत्या. मात्र, तपासात त्यांनी आपण नणंद-भावजय व जोगतीन नसून मैत्रिणी आहोत, अशी पोलिसांकडे कबुली दिली.


या दोघी मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील आसबेवाडी या गावातील आहेत. मात्र, गत अनेक वर्षांपासून या दोघी पुणे, सातारा, सोलापूर अशा विविध ठिकाणी भाड्याने खोली घेऊन राहत होत्या. त्या ठिकाणी सावज हेरून काम फत्ते झाल्यानंतर त्या ते शहर सोडून दुसऱ्या शहरात वास्तव्यास जात होत्या. या दोघीही पतीपासून विभक्त झाल्या आहेत.

१० वर्षांत तक्रारदार आला नाही पुढे

या महिलांनी दहा वर्षांपासून पुणे आणि साताºयामध्ये हनिट्रॅपचे जाळे तयार केले असून, यामध्ये अनेक जण अडकले असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे. मात्र इतक्या वर्षांत एकही तक्रारदार पुढे आला नाही. त्यामुळे या महिलांचे धारिष्ट्य अधिकच वाढले.

_______________

अश्लील क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत एका डॉक्टराकडून तब्बल ६० लाखांची मागणी करून त्यातील १२ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोन महिलांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

श्रद्धा उर्फ प्राची अनिल गायकवाड, निकिता पाटील (रा. सोमवार पेठ, सातारा) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत तर पूनम पाटील ही महिला पसार झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की साताऱ्यातील एका ४६ वर्षीय डॉक्टरची संबंधित तीन महिलांपैकी एका महिलेची ओळख होती.

या ओळखीतून दोघांमध्ये घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते. या संबंधाची व्हिडीओ क्लिप आणि फोटो संबंधित महिलेने स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते.या व्हिडिओचा आधार घेऊन या तिन्ही महिला संबंधित डॉक्टरला ब्लॅकमेल करू लागल्या.गत दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.

डॉक्टरांकडून तब्बल ६० लाखाची खंडणीची मागणी त्यांनी केली होती. जर हे पैसे दिले नाही तर पोलीस ठाण्यात तक्रार करेन आणि हॉस्पिटलवर मोर्चा आणून बदनामी करीन, अशी धमकी या महिलांनी संबंधित डॉक्टरला दिली होती.त्यामुळे भीतीपोटी डॉक्टरने १२ लाख ५ हजार रुपये दिले.

उर्वरित ४८ लाखासाठी संबंधित महिला डॉक्टरला त्रास देऊ लागल्या. त्यामुळे या त्यांच्या त्रासाला कंटाळून संबंधित डॉक्टराने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी या प्रकारची तत्काळ दखल घेऊन संबंधित महिलांना पकडण्यासाठी सापळा लावला.या सगळ्यांमध्ये दोन्ही महिला अलगद अडकल्या असून,त्यांच्याकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Mangalwedha Two women robbed many of millions;  The big racket will be exposed

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात १५ लाख ८१ हजार रुपयांचा गुटखा पकडला; तीघांविरूध्द गुन्हे दाखल

मंगळवेढ्यात १५ लाख ८१ हजार रुपयांचा गुटखा पकडला; तीघांविरूध्द गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 5, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा