
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचीही संख्या वाढत आहे.गुरुवारी एकाच दिवशी कोरोनाने तालुक्यात दोन बळी घेतले आहेत.जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रसिद्ध केलेल्या यादीत आज दोन मृत्यू झाल्याची नोंद आहे.
तर गुरुवारी तालुक्यात आणखी नव्या 11 बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या 437 झाली आहे.
कोरोनातून मुक्त होण्याची संख्याही वाढतेय गुरुवारी तालुक्यात आणखी नव्या 11 बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या 437 झाली आहे. विशेष म्हणजे दररोज जशी बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, तसेच कोरोनातून मुक्त झालेल्यांचीही संख्या वाढत आहे. तर मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी येथील एका पुरुषाचा तर दामाजी शुगर फॅक्टरी येथील 59 वर्षाचे पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
गुरुवारपर्यंत तब्बल 273 कोरोनाबाधित आजारातून मुक्त होऊन त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आता तालुक्यात अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या केवळ 156 आहे.
मात्र , तरी देखील बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी कायम होत आहे.त्यात आता काही ठिकाणी पान स्टॉल , हॉटेलही खुले झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा विळखा कमी होण्याची चिन्हे नाहीत.

दरम्यान आतापर्यंत 273 जण कोरोनावर मात करून ते कोरोनामुक्त झाले आहेत. तर दुसरीकडे आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा हा कहर कधी संपणार या प्रश्नांचे उत्तर सध्या तरी कोरोनाकडेच नाही.
आज दि.27 ऑगस्ट रोजी 37 जणांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत. तसेच आज 39 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.वरील 39 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी सर्व अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत स्वब ( RT – PCR ) चे आज 11 नागरिकांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. सदरचे नागरिक हे मंगळवेढा शहर – 1 , दामाजीनगर – 3 आणि चोखामेळानगर – 7 येथील पॉझिटिव्ह रुग्णांचे निकटतम संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 437 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 273 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आज पर्यंत 156 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.


Two victims of corona on the same day in Mangalwedha taluka; Another 11 found positive
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













