मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील जालिहाळ येथील शेतकऱ्याला पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा दोन बँकेत लाभ मिळाल्यामुळे वंचित शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.
या योजनेच्या लाभापासून तालुक्यातील अजून बहुतांश शेतकरी वंचित आहेत. नियुक्त तलाठी मुख्यालयात भेटत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मंगळवेढ्याला हेलपाटे मारावे लागत आहेत.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र शासनाने शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये वार्षिक पेन्शन देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे ही पेन्शन वर्षात तीन वेळा शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे.
दरम्यान ,नुकतीच या रकमेत वाढ करून ती आता आठ हजार रुपये करण्यात आली यासाठी शेतकऱ्यांकडून या योजनेचे ऑनलाइन अर्ज पी . एम .किसान या संकेतस्थळावर भरण्यात येत आहेत . तालुक्यात शेतकऱ्यांच्या नावाची माहिती ऑनलाइन करताना तलाठी व त्यांच्या हाताखालच्या झिरो कर्मचाऱ्याकडून खाते क्रमांक , बँक पासबुक व आधार क्रमांक चुकलेला आहे . त्यामुळे शेतकऱ्यांची त्यांच्या अनुदानाची रक्कम दुसऱ्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाली आहे . याबाबत तलाठ्याकडून शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात असतानाच खाते क्रमांक दुरुस्तीनंतरही काही गावात दुसऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा झाली .
तालुक्यातील जालिहाळ येथील भीमराव गुंडिबा खरात या शेतकऱ्याच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँक , शाखा निंबोणी व जिल्हा मध्यवर्ती बँक , शाखा निंबोणी या दोन ठिकाणच्या खात्यावर त्यांच्या अनुदानाची रक्कम जमा झाली त्यामुळे एकाच शेतकन्याला दोनदा लाभ खातेक्रमांक चुकवून देण्याचा प्रकार केला . त्यामुळे या गावातील शेतकन्यांतून संताप व्यक्त केला जात आहे . याशिवाय धोंडिबा दौला सोलनकर व बापू कृष्णा कांबळे या शेतकऱ्यांचा खातेक्रमांक चुकल्यामुळे त्यांचे अनुदान दुसऱ्या शेतकऱ्यांच्या ती रक्कम काढून नेल्यामुळे सोलनकर या शेतकऱ्याला बैंकला हेलपाटे मारून रिकाम्या हाती घरी परतावे लागले .
शेतकऱ्यांकडून या योजनेचे ऑनलाइन अर्ज पी . एम . किसान या संकेतस्थळावर करण्यात येत आहे . एकाच शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या खात्यावर दोनदा पैसे आल्याच्या प्रकाराची चौकशी करण्यात येईल . – स्वप्नील रावडे , तहसीलदार
तलाठ्याकडे बँक पासबुक , आधार कार्ड झेरॉक्स देऊनही माझ्या नावापुढे खरात या शेतकऱ्यांचा खाते क्रमांक टाकून त्याच्या खात्यात अनुदान जमा करण्याचा प्रकार केल्यामुळे अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे . भविष्यातील अनुदान माझ्या खात्यावर जमा व्हावे . पोर्टलवर अद्याप दुरुस्ती केली नाही . उलट झालेली चूक एकमेकांवर ढकलली जात आहे . – असंत जावीर , जालिहाळ

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज