टीम मंगळवेढा टाईम्स ।
रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव रतनचंद शहा यांची आज शनिवार दि.३१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजता रतनचंद शहा सहकारी बँक हॉल नंबर २ येथे स्व.सुभाषराव शहा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात येणार आहे.
तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन राहुल शहा यांनी केले आहे.
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील उत्कृष्ट गणेश उत्सव मंडळास गौरवण्यात येणार; पोलीस निरीक्षक महेश ढवाण
मंगळवेढा तालुक्यात एक गाव एक गणपती संकल्पना सर्व मंडळांनी राबवावी, तसेच पारंपरिक पद्धतीने जे मंडळ उत्सव साजरा करतील असे शहरात तीन व ग्रामीणमध्ये तीन उत्कृष्ट गणेश उत्सव मंडळ म्हणून गौरविण्यात येणार असल्याची पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितले.
शांतता कमिटी यांची आगामी गणपती व ईद-ए-मिलाद उत्सव अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी साहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, नगरपालिका विभागाचे अजित मिसाळ, संत दामाजी कारखान्याचे संचालक गौरीशंकर बुरुकुल, प्रतीक किल्लेदार, सतीश दत्तू, प्रकाश खंदारे, जमीर इनामदार, समाधान हेंबाडे, दत्तात्रय भोसले, मुझमिल काझी, अँड.रमेश जोशी, हिम्मत पाटील, राजाभाऊ चेळेकर, संभाजी घुले यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील, सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक ढवाण पुढे बोलताना म्हणाले की, सरकारने दिलेल्या निर्देशानुसार साऊंड लावण्यास परवानगी असेल.
हॉस्पिटल, शाळा, जवळ असल्यामुळे जास्त आवाज असल्यास कारवाई करण्यात येणार. जास्त डिसेबल आवाज असल्यास जवळपास 3 लाख दंड व कारवाई होणार असल्यामुळे आवाज कमी ठेवावा.
प्रत्येक मंडळाने परवानगी घेणे अनिवार्य असून शहरी भागात नगरपालिका व ग्रामीण भागात ग्रामपंचायत व पोलीस स्टेशन परवानगी आवश्यक आहे.
वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असा मंडप कोणी मारू नये, गणेश मंडळाने वीज घेताना रीतसर घ्यावी त्यासाठी वीज वितरण कंपनीकडे अर्ज करा असे आश्वासन त्यांनी केले.
अजित मिसाळ बोलताना म्हणाले की, मंडप मारताना वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे मंडप मारू नका, मंडपात वीज कनेक्शन घेताना वीज वितरण कंपनीकडून रीतसर परवानगी घेऊनच लाईट घ्यावी,
गणेश मूर्ती समोर आरती करताना काळजी घ्यावी, तसेच कमीत कमी डिजिटल बोर्ड लावा व वादग्रस्त डिजिटल लावल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
वीज कंपनीचे अमर कांबळे बोलताना म्हणले की, प्रत्येक गणेश मंडळास आम्ही सहकार्य करून कमी कागदपत्रे घेऊन कनेक्शन देऊ, गणेश मंडळास येणाऱ्या अडचणी सर्व दूर करून कनेक्शन देण्यात येईल असे आश्वासन दिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज