टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील मुख्य भागात भरदिवसा आम्ही पोलीस असून पुढे एका महिलेचा सोन्यामुळे खून झाला आहे. तुम्ही एवढे सोने घालून कशासाठी फिरताय ?
अशी बतावणी करून एका ७८ वर्षीय वृध्देचा विश्वास संपादन करून तिच्या हातातील १ लाख रुपये किमतीच्या अडीच तोळे सोन्याच्या बांगड्या काढून घेऊन विश्वासघात केल्याप्रकरणी अज्ञात दोघा तरुणाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी प्रतिमा मनोहर पाटील (वय ७८, रा. किल्ला भाग, मंगळवेढा) या ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० च्या दरम्यान फिरावयास किल्ला भागात गेल्या होत्या.
त्यावेळी दोन अनोळखी इसमापैकी अंदाजे ३५ वर्ष असलेला तरुण जवळ येऊन म्हणाला, एका महिलेचा सोन्यामुळे खून झाला आहे. तुम्ही एवढे सोने घालून कशासाठी फिरताय?
असे म्हणत फिर्यादीचा विश्वास संपादन करून हातातील दोन सोन्याच्या बांगड्या काढून देण्यास भाग पाडून विश्वासघात करून
सव्वा सव्वा तोळ्याच्या सोन्याच्या १ लाख रुपये किमतीच्या बांगड्या घेऊन अज्ञात आरोपीने पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धापटे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज