टीम मंगळवेढा टाईम्स ।
तिळगूळ व हळदी कुंकवाचे निमित्त साधून पारंपारिक पद्धतीने संसार उपयोगी वाण लुटण्याची प्रथा आहे. याचेच औचित्य साधून श्रीराम फौंडेशनच्या कार्याध्यक्षा सौ.सुप्रिया अजित जगताप यांनी अभिनव पद्धतीने हे वाण लुटले आहे.
संसार उपयोगी साहित्याबरोबरच विचारांची शिदोरी म्हणून छत्रपती शिवरायांना घडविणार्या स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ यांच्या चरित्र पुस्तकाचे वाण शहरातील 3000 महिलांच्या हाती देण्यात आले.
शिव विचारांची ही शिदोरी महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारी उर्जाच म्हणावी लागेल. परंपरेला विचारांची जोड देत विचारांचा ठेवा वाण म्हणून लुटताना, तिळगुळाची गोडी वाढवताना प्रेरणांची चरित्रे घरोघरी पोहोचावित हीच या मागची संकल्पक योजना.
या माध्यमाध्यमातून जिजाऊ चरित्राची पुस्तके घरोघरी पोहोचण्यास मदत झाली असेच म्हणावे लागेल. तसेच फाऊंडेशन च्या वतीने कोरोना काळामध्ये आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील नर्ससेचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान इंग्लिश स्कूल ज्यूनिअर काॅलेच्या उपप्राचार्या तेजस्विनी कदम वअभिनेत्री माधुरी पवार यांचेहस्ते करण्यात आला.
अभिनेत्री माधुरी पवार यांनी महिलांबरोबर संवाद साधताना मंगळवेढा व माझे जुने ऋणानुबंध असल्याचे सांगितले. मी यशस्वी होण्यासाठी मंगळवेढेकरांचे आशिर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले.
दामाजी एक्स्प्रेस या वृत्तपत्राचे वर्धापन दिनानिमित्त उपस्थित राहील्याची आठवण करून दिली व दामाजी एक्स्प्रेस वृत्तपत्राबद्दल गौरवोद्गार काढले व सर्व महिलासोबत मनसोक्त संवाद साधून आपली एक अदाकरी सादर केली.
तसेच सदर कार्यक्रमाचे सुरूवातीपासून पुणे येथील गायिका नयन शिंदे यांनी आपल्या मधूर आवाजानी भक्तीगीते, मराठी,हिंदी गाण्यानी मंत्रमुग्ध केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज